बॅनर : यूटीवी मोशन पिक्चर्स निर्माता : रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शक : इंद्रजीत नट्टोजी संगीत : अमर्त्य, राम संपत कलाकार : श्रेयस तळपदे, माही गिल, के.के. मेनन, शहनाज़ ट्रेजरीवाला, शिव पंडित
'आगे से राईट' ची कथा दिनकर वाघमारे (श्रेयस तळपदे) माही (सोनिया भट्ट), जानूभाई ( के. के. मेनन) आणि पर्ल (शहनाझ ट्रेझरीवाला) यांच्याभोवती फिरते.
मुंबईत पोलिस उपनिरिक्षक असलेल्या दिनकरचे वडिल यशस्वी पोलिस अधिकारी असतात. त्यांच्या इच्छेखातर दिनकरही पोलिस खात्यात जातो. पण तो काही वडिलांसारखा यशस्वी ठरत नाही. आजपर्यंत त्याने कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावलेला नाही. गंभीर गुन्ह्यांपासून तर तो दूरच रहाण्याचा प्रयत्न करतो.
माही टिव्हीवर न्यूज रिपोर्टर आहे. दिनकरला ती फार आवडत असते. जानूभाई दहशतवादी आहे. त्याला मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठविले आहे. त्याला भारतातले जेवण फार आवडते. इथे आल्यानंतर त्याला पर्ल फार आवडायला लागते. त्यावेळी द्वेषाचा मार्ग सोडून प्रेमाचा मार्ग अवलंबिण्याचा विचार मनात येतो.
जानूभाई इकडे पर्लला ह्रदय देऊन बसतो आणि दिनकर आपली बंदुक. चार दिवसांनतर वार्षिक परेड आहे. दिनकरला या चार दिवसात आपली बंदुक परत मिळवायची आहे. जानूभाई आणि दिनकर समोरासमोर येतात. त्यावेळी अनेक गमती जमती जन्माला येतात.