निर्माता : अनुज सक्सेना, ए. पी. पारीगी, गैरी एस. दिग्दर्शक : रॉबी ग्रेवाल संगीत : आरडीबी, ज़ुल्फी, विपिन मिश्रा, महफूज़ मारुफ कलाकार : आफताब शिवदासानी, आमना शरीफ, लिंडा, कुलभूषण खरबंदा, मनोज पाहवा, डॉली अहूलवालिया, संजय मिश्रा'
आलू चाट' ही अमेरिकेतील एका मल्टीनॅशनल बॅंकेत काम करणार्या निखिल (आफताब शिवदासानी) नामक तरूणाची कथा आहे. दिल्लीत जन्मलेला निखिल मनमिळावू स्वभावाचा असून आपल्या परिवाराच्या भेटीला भारतात येतो.
निखिलला पाहताच आमना (आमना शरीफ) घायाळ होऊन जाते. आमनाही अमेरिकेत राहत असते. मात्र तिचे विचार भारतीय संस्कृतीशी मिळते जुळते आहेत. भारतीय संस्कृती व परंपरेवर तिचा विश्वास आहे. कथानकात निक्की (लिंडा) नामक तरूणी आहे. ती अमेरिकन आहे. परंतु, तिलाही लग्नानंतर भारतात रहायचे आहे. या दोघी आणि निखिल यांचा त्रिकोण म्हणजे आलू चाट आहे.
मर्जीविरूध्द लग्न वगैरे मसालाही या आलू चाटमध्ये आहे. या व्यतिरिक्त उपकथानकांचे मसालेही यात आहेत. कौटुंबिक वातावरणात आलूचाट चांगलाच चटपटीत झाला आहे. प्रेमामधील चढउतार, संघर्ष व त्याग या विषयानाही हात घातला आहे.