बॅनर - एक्सपीरियंस फिल्म्स प्रा.ली. दिग्दर्शक - अजमल जहीर अहमदकलाकार - अनुभव आनंद, नंदना सेन, अनुपम खेर, बोमन ईरानी आर्किटेक्ट अमन (अनुभव आनंद) आपल्या काकाच्या घरी लहानाचा मोठा होतो. त्याच्यावर सगळ्यांचे प्रेम असते पण, आपल्या कुटूंबाबात त्याला तितकीशी आत्मियता नसतो. आपले स्वप्न पुर्ण करण्याच्या प्रयत्नात असणा-या अमनची भेट नेहाशी (नंदना सेन) होते. हळूहळू दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात.
आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार लग्न व्हावे अशी दोघांचीही इच्छा असते म्हणून ते वडिलांची भेट घालून देतात. पण, ही भेटच दोघांच्या प्रेमामध्ये अडसर बनते. भल्ला (अनुपम खेर) आणि पटेल (बोमन ईरानी) यांचे स्वभाव एकमेकांविरूध्द असतात. दोघेही या लग्नाला विरोध करतात. काहीही करून दोन कुटूंबांना एकत्र आणण्याचा निश्चय अमन आणि नेहा करतात.
यानंतर अनेक मजेदार घटना घडतात. पण, अमन आणि नेहाचे लग्न होते? तो आपले स्वप्न पुर्ण करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहण्यातच मजा आहे.