PR |
विवेक (विवेक सुदर्शन)ला त्याचे सर्व मित्र 'आयवी' म्हणून संबोधतात. तो एका धनाढ्य उद्योगपतीचा मुलगा असतो. त्याच्या डोक्यात बऱ्याच आयडिया असतात पण त्यांना साकारायची त्याची कधीच इच्छा होत नसते. श्रुती (सयाली भगत) आत्मविश्वासी आणि सुंदर मुलगी असते. ती एक मोठ्या डॉक्टराची मुलगी आहे आणि आपल्या मंगेतर बरोबर लग्नानंतर यूएसमध्ये स्थायिक होणार असते.
PR |
विवेक आणि श्रुतीची गोव्यात भेट होते आणि श्रुतीला बघितल्यावर विवेक तिच्या प्रेमात पडतो. पण श्रुतीच्या मनात त्याच्याबद्दल असे काही विचार येत नाही. आणि प्रेमात असफल झाल्यामुळे तो परत राजस्थानामध्ये आपल्या शहरात परततो.
PR |
दोन वर्षानंतर असा संयोग येतो की दोघेही परत भेटतात. विवेकला माहीत पडते की श्रुतीचे लग्न जुळले आहे. त्याचे काही मित्र तिला चुकीचा सल्ला देतात आणि तो श्रुतीचे अपहरण करून घेतो. या नंतर बरेच हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते व दर्शक त्याचा भरपूर आनंद घेतात.