भोपाळमध्ये राहणार्या चांदनीची (ईशा कोप्पिकर) ही कथा आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. नैतिक मूल्य व संस्कार यांच्यावर विश्वास ठेवणारी चांदनी वडील व लहान भाऊ-बहिन अनुज व संध्या यांच्यासोबत राहते. शास्त्रीय गायनात चांदनीने पदवी प्राप्त केली असून ती स्टेज परफॉर्म करते. अशाच एका कार्यक्रमात चांदनीची प्रेम (सोनू सूद) नामक तरुणाशी भेट होते व तेव्हा पासूनच त्याच्याच गुटूर गु...सुरू होते. प्रेम एक श्रीमंत कुटुंबातील असून त्याला गाण्याचा छंद आहे. चांदनी ज्या सुरात गाते तितक्यात बेसुरात प्रेम गातो. चांदनी व प्रेम यांचे आयुष्य सुख व आनंदाने भरून जाते.
चांदनी व प्रेम यांचा ज्या दिवशी सगाई होते. त्याच दिवशी चांदनीच्या वडीलांचा मृत्यु होतो. चांदनीवर दु:खाचा जणू डोंगरच कोसळतो. चांदणीच्या एका बाजूला प्रेमसोबतचे सुखी आयुष्य असते तर दुसर्या बाजुला लहान भाऊ-बहिन यांची जबाबदारी अचाकन येऊन पडते. काय करावे, अशा द्विधा मनस्थितीत ती सापडते.
लहान भाऊ बहिनीच्या प्रेमाने भारावलेली चांदनी जबाबदारी व कर्तव्यासमोर प्रेमाला गौन मानते व प्रेमशी लग्न न करण्याचा निर्णय घेते. चांदनीच्या निर्णयावर प्रेमही आपल्या प्रेमाच्या त्याग करून समर्थन जाहीर करतो. चांदनीच्या संघर्षमय जीवनात तिच्या सुख दु:खात मदत करतो.
भाऊ-बहिनीला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी चांदनीला तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागतो. तरी देखील प्रेम तिची वाट बघतो. एक तरूणी आपल्या कर्तव्यासाठी प्रेमाचा त्याग करून संघर्षमय जीवनातून आपल्या लहान भाऊ व बहिन यांना सक्षम करण्यात यशस्वी होते. स्त्री- पुरूषांच्या नात्याला 'एक विवाह ऐसा भी'मध्ये खूप महत्त्व देण्यात आले आहे