निर्माता - रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
संगीत - स्नेहा खानवलकर
कलाकार - अभय देओल, नीतू चन्द्रा, परेश रावल, अर्चना पूरनसिंह
'खोसला का घोसला' सारखे चित्रपट देऊन कायम चर्चेत रहाणारे दिबाकर बैनर्जी यांचा 'ओए लकी, लकी ओए' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. पुन्हा एकदा त्यांनी आपल्या चित्रपटात दिल्ली दाखविली आहे. आणि सेट उभा न करता त्यांनी दिल्लीत विविध ठिकाणी शूटींग केले आहे.
दिल्लीवर त्यांचे विशेष प्रेम आहे. ते म्हणतात, मी बंगाली आहे पण, मला पंजाबी असल्याची समजूत आहे कारण पंजाबी संस्कृती मी जवळून जाणतो. ओए लकी, लकी ओए ची कथा देवेद्र उर्फ बंटी नावाच्या चोरावर आधारीत आहे. तो दिल्लीच्या सेंट्रल जेलमध्ये कैद आहे. या चित्रपटात अभय देओल यांनी लकी नामक चोराची भूमिका केली आहे. लकीच्या चालाखीला दिल्ली पोलिससुध्दा दाद देतात. तो इतक्या सफाईने चोरी करतो की, सुरक्षा करणारे लोकही अचंबीत होतात.
लकीला जी वस्तु आवडते ती तो चोरतो. भलेही त्यासाठी कितीही धोका पत्करण्याची त्याची तयारी असते. दिल्लीत रहाणा-या श्रीमंत लोकांच्या घरी तो चोरी करतो. त्याच्याकडे सगळ्या सुख-सुविधा आहेत. पण, त्याला समाजात सन्मानाने जगायचे असते. 'ओए लकी, लकी ओए' मध्ये लकी चोराची ही कथा व्यंग्यात्मक पध्दतीने दाखविण्यात आली आहे.