बॅनर : फिल्मक्राफ्ट प्रोडक्शन्स प्रा.लि.
निर्माता : राकेश रोशन
दिग्दर्शक : अनुराग बसु
संगीत : राजेश रोशन
कलाकार : रितिक रोशन, बार्बरा मोरी, कंगना
जखमी झालेल्या जेला (ह्रतिक रोशन) वाळवंटात तापत्या उन्हाखाली मरण्यासाठी सोडून दिले आहे. पण नताशा (बार्बरा मोरी) या आपल्या प्रेयसीखातर तो जिवंत रहातो. कारण नताशा आल्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेलेले आहे.
जे सालसा टिचर आहे. कंगना राणावत त्याची विद्यार्थिनी. श्रीमंत कुटुंबातील कंगनाचे जेवर प्रेम आहे. पण नताशा जेच्या आयुष्यात आल्यानंतर कंगनाचा पत्ता कट होतो. नताशा स्पॅनिश असून तिला इंग्रजी येत नाही, आणि इकडे जेला स्पॅनिश अजिबात कळत नाही.
पण तरीही जे आणि नताशाच्या प्रेमात भाषेचा अडथळा येत नाही. कारण शेवटी प्रेमाला भाषा नसते. त्यांच्यात प्रेम जमते. पण सारे काही सुरळीत चालू असतानाच असे काही वळण येते की त्यामुळे सर्वच बदलून जाते. काईटस ही भाषा आणि कोणत्याही बंधनांपलीकडची प्रेमकथा आहे.