कृषला एका पत्रिकेसाठी फोटो शूट करण्याची संधी मिळते. यासाठी तो मॉरीशस मध्ये जातो. त्यांठिकाणी काही दिवस रहावे लागणार असल्याने तो कर्नल बत्रा (राजेश खन्ना) यांचा बंगला भाड्याने घेतो. कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पिया (सना खान) कृषला बघताक्षणीच त्याच्या प्रेमात पडते. कृषचे लक्ष वेधून घेणासाठी ते प्रयत्न करते. कॉलेजमध्ये आपल्या मित्रांना आपली आणि कृषची प्रेमकहाणी सांगते. आपण विवाहीत असल्याचे सांगून कृष तिला नकार देतो तरीही ती त्याची पाठ सोडत नाही. कृष आणि आपल्या मध्ये येणा-या प्रत्येकाला ठार मारायचे असे ती ठरविते.
अचानक शहरात अनेक खुन होतात. याचा तपास आई.जी. डांडा (जॉनी लीवर) यांच्याकडे असतो. इकडे कृषला मिळवण्यासाठी पिया जादूटोण्याचा आधार घेते. पिया आपला उद्देश यशस्व करते? याचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे.