दिग्दर्शक : संजय गाढवी गीत : मयूर पुरी संगीत : प्रीतम चक्रवर्ती कलाकार : संजय दत्त, इमरान खान, मिनिषा लांबा, विद्या मालवदे, राहुल देव, रीमा लागू, सोफी चौधरी (विशेष भूमिका) सोनिया (मिनिषा लांबा) तिची आई (विद्या माळवदे) व आजी यांच्यासोबत राहते. ती 10 वर्षांची असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आहे. सोनियाच्या 18 व्या वाढदिवसाच्या एक आठवड्यापूर्वीच तिचे अपहरण होते. अपहरणकर्ता कबीर (इमरान खान) या संदर्भात सोनियाच्या वडिलांशी म्हणजे विक्रांत रैनाशीच (संजय दत्त) बोलणी करतो. विक्रांत जगातील सगळ्यात श्रीमंत भारतीय असून तो सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत असतो. मुलीला वाचविण्यासाठी विक्रांत भारतात येतो.
कबीरने सांगितले काम विक्रांतला करावे लागते. प्रत्येक काम झाल्यानंतर विक्रांतला एक संकेत मिळतो व प्रत्येक संकेत त्याला सोनिया जवळ पोहचवणारा असतो.
विक्रांतला मिळणारे संकेत खरच सोनियाला वाचवण्यासाठी उपयोगी पडतील? मुलीला वाचवण्यासाठी कबीरच्या म्हणण्यावर विक्रांत किती वेळ संयम पाळतो? सोनियाच्या 'किडनॅप' मागचा कबीरचा काय हेतू आहे? आपल्या मनात वरील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असेलच! यासाठी बघायला विसरू नका 'किडनॅप'!