निर्माता : सोहेल खान
दिग्दर्शक : पुनीत सिरा
संगीत : डब्बू मलिक
कलाकार : जॅकी श्रॉफ, सोहेल खान, अरबाझ खान, दिया मिर्झा, नौहीद, दिलीप ताहिल.
दयाल सिंह (जॅकी श्रॉफ) पंजाबात वडिलोपार्जित शेती करतो आहे. आपली मुले अमन (अरबाझ खान) आणि जिगर (सोहेल खान) यांना तो वेगवेगळ्या पद्धतीने मोठे करतो. अमन कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करतो आणि मगच ते करतो. जिगर त्याच्या उलट आहे. तो कोणताही विचार न करता ते काम करून टाकतो. दयाल आपल्या एका मुलाला वकिल आणि दुसर्याला शेतकरी बनवू इच्छितो.
सोहन सेट (दिलीप ताहिल) उद्योगपती आहे. शेतकर्यांच्या जमिनी लुबाडणे हा त्याचा धंदा आहे. त्यासाठी तो निर्मल (रोमियो) या गुंडाची मदत घेतली जाते.
हे सगळे वातावरण दयाल सिंहपर्यंत येऊन थडकते. या वादळात दयालचे कुटुंब दोन विचारांत विभाजित होते. या परिस्थितीचा फायदा उठवून सोहन सेठ अमनला त्याच्याच कुटुंबियांविरोधात उभा रहाण्यास भाग पाडतो. सोहन सेठविरोधात जिगर व दयाल सिंह लढाई लढतात.
पण पुढे काय होते, हे पाहण्यास किसान बघावा लागेल.