बँनर : आशुतोष गोवरीकर प्रोडक्शन्स, पीवीआर पिक्चर्स
निर्माता : सुनीता गोवारीकर, अजय बिजली, संजीव के. बिजली
दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर
संगीत : सोहेल सेन
कलाकार : अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, सिकंदर खेर
रिलीज डेट : 3 दिसंबर 2010
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांचे योगदान आहे. यात अनेकांना प्रसिद्धी मिळाली तर अनेक जण प्रसिद्धीपासून दूरच राहिले. त्यांचे योगदान महत्वाचे असले तरी त्या विषयी कुणालाही फारसी माहिती नाही.
आशुतोष गोवारीकरचा आगामी चित्रपट खेले हम जी जान से हा यातीलच एक भाग आहे. बंगालमध्ये 18 एप्रिल 1930 रोजी चिटगाव येथे 64 क्रांतिकारकांनी इंग्रजांवर हल्ला चढवला होता.
या हल्ल्यानंतरच देशभरात इंग्रजांविरोधात आणखी हल्ले करण्यात आले. या चित्रपटात याच क्रांतिकारांविषयी दाखवण्यात आले आहे.
मानिनी चॅटर्जी यांच्या ‘ डू एंण्ड डाय-द चिटगाव अपरायजिंग 1930-34’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत असून, लगान, जोधा अकबर सारखे चित्रपट काढणार्या आशुतोषने हे पुस्तक वाचल्यानंतर हा चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला होता.
ज्या 64 क्रांतिकारकांनी इंग्रजांवर हल्ला चढवला होता, त्यात 56 तरुण व दोन महिला क्रांतिकारक होत्या. दीपिका या चित्रपटात कल्पना दत्ता या महिला क्रांतिकारकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या गटाचे नेतृत्त्व सुरज्य सेन नावाच्या एका शिक्षकाने केले होते. या भूमिकेत आपल्याला अभिषेक बच्चन दिसणार आहे.