निर्माता : स्मिता मारू, विनोद सूर्यदेवरा
दिग्दर्शन-संगीत : सिंगीतम श्रीनिवास राव
एनिमेशन दिग्दर्शक : ओवेल मायना
'बाल गणेश'च्या यशानंतर आता शेमारू एंटरटेंन्मेंटने 15 कोटी रुपये खर्चुन 100 मिनिटांचा घटोत्कच हा नवा कोरा एनिमेशनपट बालगोपाळांसाठी आणला आहे. भीमपुत्र घटोत्कचावर प्रसिद्धीचा झोत आजपर्यंत फारसा प़डलेला नव्हता. याचा फायदा या चित्रपटाला मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
भीम आणि हिडींबा यांचा मुलगा असलेला घटोत्कच जंगलातला राजकुमार आहे. त्याला सगळे प्रेमाने घट्टू म्हणतात. आपल्या विविध शक्तींच्या माध्यमातून तो नानाविध प्रयोग करत असतो. गरीबांची मदत करणारा कनवाळू असा हा घटोत्कच आहे. घट्टूची मैत्री या जंगलातील एका हत्तीशी होते. त्यांची मैत्री आणि त्यांनी केलेल्या विविध खोड्या यात भरपूर मनोरंजन करणार्या आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंगीतम श्रीनिवास राव यांनी केले आहे. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या या क्षेत्रातील अनुभवात 60 असे विविध चित्रपट बनवले आहेत. यात 'लिटल जॉन', 'पांडववास' आणि 'सन ऑफ अलादीन' हे चित्रपट आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू व बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे.