दिग्दर्शक : कबीर कौशिकगीतकार : समीर संगीत : मोंटी शर्माकलाकार : बॉबी देओल, प्रियंका चोप्रा, डॅनी, इरफान खान, राजपाल यादव, आर्य बब्बर, रितेश देशमुख (विशेष भूमिका)विजयेता फिल्मस् प्रा. लि. चा ‘चमकू’ हा चित्रपट चंद्रमसिंग उर्फ चमकू या पात्राभोवती फिरतो. चमकू लहान असतानाच त्याच्या कुटुंबियांची हत्या केली जाते. बिहारमधील जंगल भागातच नक्षलवाद्याकडून त्याचे पालन-पोषण केले जाते.चमकूचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रॉ व आयबीद्वारा सरकारी कार्यक्रमांसाठी त्याची निवड होते. तेथे चमकूची अर्जुन तिवारी (रितेश देशमुख) सोबत मैत्री होते. चमकू लोकांना मारणे, एनकाउंटर करने व विविध योजना बनवण्यात माहिर असल्याने लोकप्रिय होतो. अशा या चमकूच्या जीवनात एक मोठा बदल घडतो. तो चक्क प्रेमात पडतो. त्याची प्रेयसी शुभी (प्रियंका चोप्रा) एक शिक्षिका आहे. शुभीच्या सहवासात राहिल्यानंतर त्याला जीवन किती मजेदार आहे हे कळते. मात्र, वारंवार त्याचा भुतकाळ त्याच्या पुढे उभा ठाकतो.
चित्रपटात डॅनीने 'बाबा' नावाची भूमिका केली असून तो नक्षलवाद्यांचा प्रमुख आहे. तर राजपाल यादव हा 'हुसैन' नावाने पोलिसांच्या खबर्याच्या भूमिकेत आहे. पण पुढे काय घडेल? चमकू आणि बाबा यांच्यात संघर्ष रंगतो का? चमकू आपले पालन पोषण करणार्या नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतो का? शुभीशी त्याचे लग्न होते का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर 'चमकू' पाहिल्यानंतरच मिळेल.