एकदिवस त्यांच्यासारखा निकाल लागतो पण, शाळेकडे पैसे नसल्याने शाळेच्या मलमत्तेतील वाटा देण्याचे आदेश न्यायालय देते. दीपकच्या वडिलांना शाळेची एक बस स्कूल त्यांना मिळते. ही बस चालवूनू पैसे कमाविण्याचा ते विचार करतात आणि दीपकलाही ही कल्पना पटते. पण, त्याच्या दोन बहिणी छाया, अपर्णा (उपासना सिंह आणि अमिता नांगिया) तसेच जावई विनायक अग्रवाल (असरानी) आणि यूयू उपाध्याय (मनोज जोशी) यांना वडिलांचे म्हणणे मुळीच पटत नाही. बस चालविणे चांगले काम नाही, असे त्यांचे म्हणणे असते. बस विकण्याचा ते सल्ला देतात.
दीपकचा मित्र सुंदर (राजपाल यादव) अमेरिकेत जाण्यासाठी वीसा मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. तो दीपकबरोबर 'चल चला चल ट्रान्स्पोर्ट' ही कंपनी सुरू करतो. पण, बस एकदमच खटारा असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी त्यांचा खूप पैसा खर्च होतो.
दीपक आपल्या बससाठी बसंतीलाल (रज्जाक खान) या ड्रायवर आणि हरीलाल (आसिफ बसरा) या कंडक्टरची नेमणूक करतो. बसंतीलालच्या डोळ्यावर मोठा चष्मा तर हरीलालची नजर नेहमीच हेरफेरीकडे असते. येथेही दीपकच्या मागे भ्रष्टाचार लागतोच. थोड्याच दिवसात त्या दोघांवर दीपक वैतागून जातो पण, ते दोघे युनियन लीडर मि. सिंह (मुरली शर्मा) याच्या जवळचे असल्याने तो त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही.
या बसमधून पायल (रीमा सेन) नेहमीच प्रवास करत असते. तिचे दीपकवर प्रेम जडते. पण, येथेही दीपक अडचणीत येतो. एकदिवस पायलला बसची धडक बसते आणि तिचे हाड मोडते. ती सुद्धा दीपककडून पैसे वसूल करण्याच्या मूडमध्ये असते.
दीपक आपली सुरूका करून घेतो पण, ते कसे हे जाणून घेण्यासाठी पहा 'चल चला चल'