निर्माता - एलेकॉम फिएस्टा एंटरटेनमेंट प्रा. लि. दिग्दर्शक - आर. डी. मलिक अॅनिमेशन - शंतनू पालसंगीत - जीतवेळ - 80 मिनिट'
चिंटी चिंटी बैंग बैंग' हा एक अॅनिमेशन चित्रपट आहे. यामध्ये आशिष विद्यार्थी, महेश मांजरेकर, असरानी, अंजन श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे. मुंग्यांच्या साम्राज्याची ही कथा आहे.
एकीकडे लाल मुंग्यांचे तर दुसरीकडे काळ्या मुंग्यांचे साम्राज्य आहे. तलावाच्या काठावर असणा-या बंगल्यामध्ये हे साम्राज्य आहे. लाल आणि काळ्या मुंग्यांचे कधीच पटत नाही. त्या एकदुस-यांना मूर्ख समजतात. एकेदिवशी लाल मुंग्यांमधील एक म्हातारा काळ्या मुंग्यांमधील आत्याला त्रस्त करतो. काळी आत्या त्याची तक्रार काळ्या मुंग्यांच्या साम्राज्यातील राणीकडे करते. काली राणी ही बाब काळ्या राजाला सांगते आणि त्या लाल म्हाता-याचे मुंडके मागते.
काळा राजा लाल साम्राज्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू करतो. लोहित (लाल राजकुमारी) आणि कृष्णा (काळा राजकुमार) यांचे प्रेमप्रकरण सुरू असते. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. काळा राजा आपल्या सहका-यांना (बेडूक, सरडा) घेऊन रणांगणात येतो. आणि मग.. पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी पाहा 'चिंटी चिंटी बैंग बैंग'