Article Film Preview Marathi %e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%ae 107050300007_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनी कम

चीनी कम

वेबदुनिया

निशब्द नंतर अमिताभ बच्चनचा आणखी एक असाच चित्रपट या मे महिन्यात येतोय. चीनी कम नामाच्या या चित्रपटात बुध्ददेव गुप्ता (अमिताभ) हा 64 वर्षाचा दाखवला आहे मात्र तो लहान मुलासारखे वागत असतो तर नीना वर्मा (तब्बु) ही 34 वर्षाची दाखवली आहे.

मात्र तीचा स्वभाव व वागणे हे एखाद्या म्हतार्‍या बाईसारखे दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे बाळकृष्णन यांनी. बुध्ददेव हा लंडनमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ असतो, मात्र त्याला सगळे मालकाप्रमाणे समजत असतात.

एकप्रकारे हॉटेल त्याच्याच ताब्यात असते. बुध्ददेव लंडनमध्ये आपल्या 85 वर्षाच्या आईबरोबर रहात असतो.
त्याला एकमात्र मैत्रिण असते ती म्हणजे शेजारची 9 वर्षाची मुलगी तिचे नाव असत सेक्सी. बुध्ददेव हा गुप रागीट असतो मात्र त्याचे व्यक्तीमत्व हे जिदादिल असते.

जेवण बनवणे हा त्याचा आवडता छंद असतो. पण त्याने आयुष्यात कधी कोणावर प्रेम केलेले नसते. एके दिवशी नीना त्याच्या हॉटेलमध्ये येते व तेथून खरी कथा सुरू होते तो तिच्यावर प्रेम करू लागतो.

ती एकदम शांत स्वभावाची सुंदर महिला दाखवली आहे. तिच्या चेहर्‍यावर सतत हास्य असते. परंतु तिला स्वतंत्र राहणे आवडत असते. त्या दोघांचेही एकमेकांशी जुळायला लागते व प्रम जमते. ते दोघे लग्न करायचे ठरवतात. नीनाचा हात मागण्यासाठी तो तिच्या घरी जातो.

नीनाच्या वडीलांच्या भूमिका परेश रावलने केली आहे. पण सगळ्यात मोठी अडचण असते की परेश रावल हा 58 वर्षाचा असतो तर त्याचा होणारा जावई हा 64 वर्षांचा असतो. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पहावा लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi