निर्माता - शाम बजाज दिग्दर्शक - पुनीत सिरा संगीत - बप्पा लाहिरी कलाकार - फरदीन खान, दीया मिर्जा, कुणाल खेमू, अंजना सुखानी, अरबाज खानजय आणि वीरूचे नाव घेताच अमिताभ बच्चन आणि धमेंद्रची जोडी डोळ्यासमोर येते. 'शोले' या चित्रपटात जय आणि वीरूच्या जोडीने धम्माल उडवून दिली होती. दिग्दर्शक पुनीत सिरा यांना दोन मित्रांवर चित्रपट करावासा वाटला तेव्हा त्यांनाही जय-विरूची जोडी आठवली आणि त्यांनी आपल्या चित्रपटाचे नावच 'जय-विरू' ठेवले. या चित्रपटात जयच्या भूमिकेत फरदीन खान तर वीरूच्या भूमिकेत कुणाल खेमू आहे.
जय आणि वीरू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण, ते एकमेकांचे शत्रू बनतात. खरेतर त्यांचा काटा काढण्यासाठी तेजपाल (अरबाज खान) दोघांच्यात वितुष्ठ निर्माण करतो. घटनाच अशी घडते की ज्यामुळे ते एकमेकांसमोर येतात आणि जिवंत रहाण्यासाठी एकमेकांशी युध्द करावे लागते. यामध्ये कोण मरतो आणि कोण जिंकतो? दोघेही मरतात की दोघेही जिवंत राहतात? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपटच पहावा लागेल.