जश्नची कथा आहे, आकाश वर्मा या (अध्ययन सुमन) वीस वर्षाच्या मुलाची. संगीतातील दुनियेचा स्टार बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. पण त्याचा स्वभाव आखडू आणि संतापी आहे. पण तितकाच रोमॅंटिकही आहे. त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची बहिण निशा (शहाना गोस्वामी) मदत करते. भावाला सर्व काही मिळावे यासाठी ही त्याची बहिण उद्योगपती अमन बजाजची (हुमायूँ सईद) रखेल बनली आहे. आकाश अमनला पाण्यात पहातो.
सारा (अंजना सुखानी) एक मस्त मुलगी आहे. कशाचीही चिंता तिला नाहीये. आकाश आणि तीची भेट एकदा होते. दोघांचे प्रेम जमते. मग सारा त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देते.
आकाश आपले स्वप्न पूर्ण करू शकेल काय? त्यासाठी अमनची मदत घेईल काय? या सगळयासाठी जश्न पहावा लागेल.