Article Film Preview Marathi %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%a4%e0%a5%82 %e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%a8%e0%a4%be 108062900013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाने तू... या जाने ना

जाने तू... या जाने ना
PRPR
निर्माता : मंसूर खान, आमिर खान
निर्देशक : अब्बास टायरवाला
संगीत : ए. आर. रहमान
कलाकार : इमरान खान, जेनेलिया, मंजरी, अयाज़ खान, करण माखीजा, सुगंधा गर्ग, निराव मेहता, अनुराधा पटेल, रत्ना पाठक-शा

सुख-दु:ख, रोमान्स, प्रेमभंग, कॉमेडी, नाच-गाणे आणि फिल्मी ढीश्यां-ढीश्या अशी चटकदार भेळ पाहायला मिळेल ‘जाने तू... या जाने ना’मध्ये. चित्रपटाचा नायक आहे जयसिंह राठोड (इमरान खान) तर नायिका आहे अदिती महंत (जेनेलिया). दोघांकडे पाहिले तर यांची जोडी स्वर्गातल्या एखाद्या पेस्ट्री शॉपमध्ये बनविल्यासारखी वाटावी.

हिंसा या भावनेवर अजिबात विश्वास नसलेला जय हा एक रजपूत युवक आहे. तर अदिती प्रचंड उतावळी आणि हिंसक. तुम्ही हव ते करा पण तिच्या वाट्याला गेलात तर मग तुमची खैर नाही. तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला रक्तबंबाळ करेपर्यंत मग ती सोडणार नाही. हे असेच चालू राहील जोपर्यंत जय येऊन तिला थांबवीत नाही. या रान मांजरीवर नियंत्रण आणू शकेल असा एकमेव माणूस आहे, आणि तो केवळ जय.

webdunia
PRPR
जयच्या मतानुसार अदितीच्या या वागणुकीत तिच्या पेक्षा तिचे आई-वडीलच दोषी आहेत. लहानपणापासूनच मुलीवर नियंत्र ठेवले असते तर ती हातची गेली नसती असा त्याचा पक्का समज. तर जयचा अहिंसक व्यवहार अदितीला अजिबात आवडत नाही. तिच्या मतानुसार जय आजवर तिने पाहिलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक भित्रा माणूस आहे.

या सोबतच कथेच इतर मसालाही आहे. रोतलूच्या मना अदितीसाठी 'कुछ कुछ होता है'. तर बॉंबस्चे हृदय जयसाठी धडधडते. जिग्गी आणि शालीन यांची कथा तर वेगळीच आहे.

तर... अदिती व जय दोघांच्या स्वभावात प्रचंड विरोधाभास असला तरीही दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशीच वाटत राहते. ही गोष्ट त्यांच्या सर्व मित्रांना माहितेय, त्यांच्या आई-वडिलांनाही कळतेय, सर्वांना जाणवतेय... पण जय-अदितीला उमगलीय?

या दोघांना ती कळते? दोघांची हृदयात एकमेकांसाठी धडधडतात का? यालाच प्रेम म्हणतात हे त्यांना उमगेल काय? म्यूझिकल-रोमॅटिक-कॉमेडी या सर्वांनी ओतप्रोत असलेला ‘जाने तू... या जाने ना’ हा असा चित्रपट आहे.

चित्रपटाल्या व्यक्तिरेखा

webdunia
PRPR
जयसिंह राठोड (इमरान खान)
जय मूळचा राजस्थानातला. वडिलांचे तो लहान असतानाच निधन झालेले, आई सावित्री यांनी त्याचे पालन-पोषण केले. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर राजस्थानातूओन ते मुंबईला आले. आई एक सामाजिक कार्यकर्ती आहे, आणि मानवाधिकारांसाठी त्यांचा लढा आहे.

भारतीय आयांमुळेच त्यांची मुले बिघडत चालल्याचे सावित्रीचे मत. म्हणूनच त्यांनी जयला त्यांनी आवश्यक तितकेच प्रेम दिलेले. सकाळचा चहा-नाश्ता बनविण्यापासून स्वतःचे कपडे धुण्यापर्यंत सर्व काम जय स्वतःच्या हाताने करतो. इतके असूनही जय आणि त्याच्या आई यांच्यात चांगली मैत्री असते. दोघे एकमेकांच्या विचारांनाही महत्त्व देतात. तर जयच्‍या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा विषय आहे, ती अदिती. पहिल्या भेटीनंतर दोघांत खूप चांगली मैत्री होते.

एकमेकांपासून अजिबातच वेगळे न राहणारे जय-अदिती जेव्हा सोबत नसतील तेव्हा एकमेकांशी फोनवर तासंतास बोलत असतात.

अदिती महंत (जेनेलिया)

webdunia
PRPR
अदिती लहान असताना तिचे मित्र तिला 'काली बिल्ली' म्हणत असल्याचे एकदा सहज तिने जयला सांगितले. जयने त्यात दुरुस्ती करून तिचे नामकरण केले ‘म्याऊँ’. जय व्यतिरिक्त जर कुणी अदितीला ‘म्याऊँ’ म्हटलेलं तिला अजिबात आवडत नाही. अशा वेळी ती समोरच्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही.

आयुष्याची पूर्ण मजा घेत अदिती जगतेय. सहजच हसणारी, खूप बोलणारी अदिती तितकीच रागीटही आहे. अतिशय सुंदर असलेल्या अदितीशी मैत्री करायचा किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न अजिबात करून नका करणं ते खूपच कठीण काम आहे.

अदिती सोबत इतके दिवस राहूनही जय जिवंत कसा याचेच सर्वांना अप्रूप वाटते. मात्र जयला त्रास देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका हं... अहं... जय काहीही करणार नाही. अदितीशी शत्रुत्व घेऊन दिवस भरलेत वाटतं.


फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...

Share this Story:

Follow Webdunia marathi