निर्माता- संदीप कपूरदिग्दर्शक- आर. आनंद कुमारगीत-समीरसंगीत-सचिन गुप्ताकलावंत- मनोज वाजपेयी, ह्रषिता भट, विजय राज, संजय मिश्रा, गोविंद नामदेव. दिल्लीतील रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करणार्यांवर सरकारने कारवाई केली होती. त्यावर 'जुगाड'ची निर्मिती करण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारीत चित्रपट अशी त्याची जाहीरात केली जात आहे. एका जाहिरात एजन्सीच्या सीईओबरोबर या चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडली होती. या जाहिरात एजन्सीला सील करण्यात आले होते. हे सील काढून आपल्या एजन्सीला वाचविण्याच्या प्रयत्नात या सीईओला बरेच काही करावे लागते. त्यासाठी सरकारी अधिकार्यांपासून ते नेत्यांपर्यंत त्याला जावे लागते. त्यांच्याकडे शब्द टाकावा लागतो. अशा लोकांना 'जुगाडू' असेही म्हटले जाते. ही मंडळी कुठूनही आपले काम करू शकतात.
या सीईओच्या मार्गात अनेक अडथळे येतात. त्याचे काम काही केल्या होत नाही. हा सारा संघर्ष विनोदी पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटाचे शुटींग दिल्ली, गुडगाव व मुंबईमध्ये करण्यात आले आहे.