बॅनर : परसेप्ट पिक्चर कंपनी, भांडारकर एंटरटेनमेंट दिग्दर्शक : मधुर भांडारकर संगीत : शरीब साबरी, तोशी साबरी, शमीर टंडन कलाकार : नील नितिन मुकेश, मुग्धा गोडसे, मनोज बाजपेयी, आर्य बब्बर, चेतन पंडित, राहुल सिंह
पराग दीक्षित (नील नितिन मुकेश) साधा सरळ मुलगा आहे. मानसी (मुग्धा गोडसे) त्याची गर्लफ्रेंड आहे. मस्त आयुष्य चालले आहे. या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येते. त्यामुळे परागला तुरूंगात जावे लागते. तिथे त्याला पोलिस झोडपतात. तुरूंग म्हणजे नरक याची अनुभूती त्याला येते. पण हेही एक आयुष्य आहे आणि इथेही लोक रहातात याची जाणीव त्याला होते.
IFM
IFM
या जेलमध्ये त्याची दोस्ती नबाबशी (मनोज वाजपेयी) होते. वीस वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी तो इथे आला आहे. त्याची इथे दहशत आहे. नवाबमुळे परागला आतले विश्व कळते. अनेक गुन्हेगार नसलेली मंडळी आत सडताहेत. त्याचवेळी काही अट्टल गुन्हेगार मात्र आरामदायी जीवन जगताहेत हेही त्याला जाणवते. या सगळ्या प्रकारात स्वतःचे शोषण होऊ देणे किंवा त्याविरूद्ध आवाज उठवणे यापैकी कोणता तरी एक मार्ग त्याला स्वीकारायचा असतो. तो यापैकी कोणता मार्ग निवडतो? त्यासाठी 'जेल' पहायला हवा.