नैना सिंग (गुल पनाग) बिंदास मुलगी असून तिला आपले जीवन फारच पसंत आहे. ती एका विज्ञापन एजेंसीमध्ये काम करीत आहे. प्रतिभाशाली असून ती महत्त्वाकांक्षीपण आहे.
मित्रांसोबत पार्टी करणे, ड्रिंक्स घेणे, शॉपिंग करणे आणि चॉकलेट खाणे हे तिचे खास छंद आहे. आपल्या मित्र मंडळीला ती आपले परिवार मानते. तिचा एक बॉयफ्रेंड आहे ज्याच्या सोबत ती लग्न करून आपले पुढचे आयुष्य त्याच्या सोबत काढणार आहे, असा तिचा विचार आहे.
‘टर्निंग 30’ एक अशा महिलेची यात्रा आहे जी 30 वर्षाची होत आहे आणि नवीन स्वरूपात ती आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे.