Article Film Preview Marathi %e0%a4%9f%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8b 110121400016_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टूनपुरचा सुपरहीरो

टूनपुरचा सुपरहीरो अजय देवगन

वेबदुनिया

IFM
बॅनर : बिग स्क्रीन एंटरटेनर, इरोज एंटरटेनमेंट
निर्माता : कुमार मंगत पाठक, कृषिका लुल्ला
दिग्दर्शक : किरीट खुराना
संगीत : अन्नू मलिक
कलाकार : अजय देवगन, काजोल, तनूजा, अमय पांडे, चिंकी जयस्वाल, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, डेलनॉज पॉ

लहान मुलांना लक्षात ठेवून तयार केलेले चित्रपट ‘टूनपुर का सुपरहीरो’ ख्रिसमसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात एनिमेशनचे भरपूर प्रयोग करण्यात आला आहे.

आदित्य (अजय देवगन) एक सुपरस्टार असून तो व त्याची बायको प्रिया (काजोल) जीवनातील प्रत्येक भागात यश मिळवत आहे. पण आदित्यच्या मुलांना सारखे असे वाटत असते की आपले वडील सुपरस्टार नाही आहे.

मुलांची इच्छा असते की त्यांचे वडील रील लाईफमध्ये नव्हे तर रियल लाईफचे हिरो असायला पाहिजे. स्वत:ला रियल हिरो साबीत करण्यासाठी आदित्यच्या हातात अखेर एक मोका येतो.

तो स्वत:ला मुलांच्या आवडीचे कार्टून टूनपुरमध्ये बघतो. तेथील वातावरण चांगले नसते. टूनासुर (दैत्य टून) ने देवाटून (चांगले टून)साठी बरेच संकट उत्पन्न केलेले असतात.

टूनासुर आणि देवाटूनमध्ये युद्ध होत आणि आदित्य देवाटूनकडून लढाई लढतो. काय देवाटून युद्ध जिंकेल? काय आदित्य स्वत:ला रियल हिरो साबीत करण्यात यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील गंमतशीर टून यात्रेच्या दरम्यान.

Share this Story:

Follow Webdunia marathi