निर्माता : मुकेश रमानी
दिग्दर्शक : रमेश खटकर
संगीत : संदेश शांडिल्य, सिद्धार्थ, सुहास
कलाकार : अश्मित पटेल, रणविजय सिंह, प्रशांत राज, आरती छाबडि़या, मधुरिमा बैनर्जी, ज़ाकिर हुसैन, सुशांत सिंह, महेश मांजरेकर, राजपाल यादव, विजय राज
टॉस ही कथा आहे लहानपणापासून एकत्र असलेल्या मित्रांची. सुटी साजरी करून ते परत आले आहेत. पैसा लुटून ऐशमध्ये रहायचे असा त्यांचा हेतू आहे. त्यासाठी ते एक प्लॅन करतात. त्यात किती जोखीम आहे, याचाही अंदाज घेतात. पण तिथे एक चूक करतात. लूट केल्यानंतर त्यांच्यातच भांडणे सुरू होतात. त्याच्यातूनच एकमेकांचे खून सुरू होतात. एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी घडत जातात. त्याचा शेवट काय ते पडद्यावरच पहायला मजा येईल.