Article Film Preview Marathi %e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%a8 %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80 108052200020_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉन मुत्थुस्वामी

डॉन मुत्थुस्वामी
IFMIFM
निर्माता : शक्ती सामंता
दिग्दर्शक : आशीम सामंता
संगीत : अनु मलि
कलाकार : मिथुन चक्रवर्ती, हृषिता भट्ट, रोहित रॉय, शक्ती कपूर

अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा मिथुन आपल्याला बॉलीवूडपटात दिसणार आहे. डॉन मुत्थुस्वामी असे या चित्रपटाचे नाव आहे. यात मिथुनने डॉनची भूमिका केली आहे. मिथुन मुंबईचा डॉन असतो. त्याला सगळेच घाबरत असतात. त्याला कळते की त्याचे वडील खूप आजारी आहेत, आणि त्यांची वाचण्याची शक्यता कमी आहे. मिथुन त्यांना भेटण्यासाठी जातो. त्याच्या वडिलांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड राग असतो. ते त्याच्या मुस्कटात लगावतात आणि त्याला सांगतात की त्याच्या गुंडगिरीमुळे त्यांचे नाव खराब झाले आहे.

webdunia
IFM
मिथुनलाही याचे खूप वाईट वाटते. तो त्यांना वचन देतो, की तो चांगला माणूस बनून दाखवेल. तो आपल्या सार्‍या माणसांना जमा करतो आणि फर्मान सोडतो सर्वांनी चांगले वागायचे. यासाठी तो जयकिशन (मोहित रैना) याच्याकडे भाषा सुधारण्यासाठी क्लास लावतो. यानंतर त्याच्यावर जणू संकटांचे आभाळ कोसळते. विरोधी गुंड त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलायला लागतात. आणि मग त्याला त्याचा चांगुलपणाही काही ठिकाणी नकोसा वाटतो. परंतु, त्याच्या समोर यक्षप्रश्न आहे तो म्हणजे त्याच्या मुलीचा. डॉनला त्याची मुलगी संजना (हृषिता भट्ट) हिचे लग्नही करायचे आहे. त्याला त्याचा खास मित्र वर्धन याच्या मुलाशी संजनाचे लग्न लावण्याची इच्छा असते. परंतु संजनाला तो मुळीच पसंत नसल्याने ती, आपण आई बनणार असल्याचे खोटेच नाटक करते.

मुत्थुचा व्यवस्थापक प्रीतम (रोहित रॉय) चे संजनावर प्रेम असते. त्याला ती आवडत असते. पण तो लालची असल्याने आणि त्याची स्वभाव चांगला नसल्याने संजनाला तोही आवडत नसतो. संजनाचे प्रेम जयकिशनवर असते. तो मुत्थुला शिकवायला आल्यानंतर त्यांचे सुत जुळते.

आता पुढे काय?
या दोघांच्या लग्नाला डॉन परवानगी देणार का?
त्यांचे लग्न होणार का?
प्रीतमची चोरी डॉनला कळणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर पाहा डॉन मुत्थुस्वामी

Share this Story:

Follow Webdunia marathi