Publish Date: Fri, 03 Dec 2010 (14:21 IST)
Updated Date: Fri, 03 Dec 2010 (14:20 IST)
बँनर : हरीओम प्रोडक्शन्स, थ्रीज़ कंपनी, यूटीव्ही मोशन पिक्चर्स
निर्माता : ट्विंकल खन्ना, शिरीष कुंदर, रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : फराह खान
संगीत : विशाल शेखर
कलाकार : अक्षय कुमार, कॅटरीना कैफ, अक्षय खन्ना, रघु राम, आर्य बब्बर, सलमान खान (पाहुणा कलाकार)
रिलीज डेट : 24 डिसेंबर 2010
बॉलीवुड मधील बहुतांश महिला दिग्दर्शक किंवा निर्मात्या या आर्ट चित्रपट काढण्यावर भर देत असतात. परंतु यात असलेल्या फरहा खानची खरीच कमाल मानावी लागेल.
ओम शांती ओम, मैं हूं ना या सारखे हिट चित्रपट काढल्यानंतर आता तिने आणखी एक चित्रपट काढला आहे. तीस मार खाँ. फरहाने या चित्रपटात शाहरुखला वगळून अक्षयला काम दिल्याने शाहरुख तिच्यावर नाराज आहे.
असे असले तरी हा चित्रपट सुपर हिट ठरेल अशी आशा फरहाला आहे. या चित्रपटातील नायक अर्थात अक्षय तबरेज मिर्झा खान एक चोर असतो. तो इतका निर्लज्ज आहे की, तो कशालाच घाबरत नसतो.
त्याच्या गँगमध्ये असणार्या त्याच्या साथीदारांची नावेही डॉलर, सोडा, बर्गर अशी असल्याने चित्रपटात एक वेगळेपण आहे. ही गँग सतत पोलिसांना हैराण करुन सोडत असते.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे नाव चर्चिले जात असल्याने एक गँग त्यांना चोरी करण्याची सुपरी देते.
ही तब्बल 500 कोटी किमतींच्या वस्तूंची चोरी असल्याने आणि ट्रेनमध्ये त्याला चोरी करावी लागणार असल्याने या चित्रपटाचे शुटिंग ट्रेनमध्येच करण्यात आले आहे.
तरबेज खान चोरी करण्यात यशस्वी होतो का? कॅटरीना त्याला कुठे भेटते? या प्रश्नांचा उलघडा होण्यासाठी हा चित्रपट पहाण्याची गरज आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा