द ट्रेन
विवाहबाह्य संबंधाची (आणखी एक) कथा
दिग्दर्शक : रक्षा मिस्त्री व हसैन हैदराबादवाला
संगीत : मिथून
कलाकार : इमरान हाशमी, गीता बसरा, सायली भगत, रजत बेदी
'द ट्रेन' ची कथा विशाल (इमरान हाशमी) भोवती फिरते. तो त्याची पत्नी अंजली (सायली भगत) व मुलगी निक्कीबरोबर बॅंकॉकमध्ये रहात असतो. या दोघा पतीपत्नीत सारखी भांडणे होत असतात.
त्यांचे लग्न तुटण्यापर्यंत आले असते. याच काळात विशालची भेट रोमाशी (गीता बसरा) होते. विशाल व रोमा प्रेमात पडतात. आणि एका क्षणी ते सर्व मर्यादा ओलांडतात. अंजलीला विशालचा संशय येतो. विशाल एकीकडे पत्नी अंजली व दुसरीकडे प्रेयसी रोमा यांच्यात अडकतो.
दरम्यानच्या काळात विशालच्या एका शत्रूला ही बाब कळते. तो त्याला ब्लॅकमेल करायला लागतो. विशाल ब्लॅकमेल करणार्याचा शोध घेतो आणि त्याला मारण्याची योजना बनवतो. अशाप्रकारे ही कथा पुढे गूढ वळण घेते. नेहमीप्रमाणे इमरान हाशमी याही चित्रपटात विवाहबाह्य संबंधात अडकला आहे. नेमके चित्रपटात काय आहे, ते प्रदर्शित झाल्यावरच कळेल.