rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

द मर्डरर

द मर्डरर सिनेगप्पा
IFM
निर्माता : सलीम
दिग्दर्शक : राज एन. सिप्प
गीत : इब्राहीम अश्
संगीत : सोहेल सेन
कलाकार : मिमोह चक्रवर्ती, सिमरन, मधु, मोनालिसा, रझा मुराद, मिलिंद गुणाजी, शांतिप्रिया, शक्ती कपूर, आशुतोष राणा

मिथुन चक्रवर्तीचे चिरंजीव मिमोह चक्रवर्ती यांची गाडी काही अजूनही रूळावर आलेली नाही. फालतू चित्रपट स्वीकारल्याने त्याची गाडी अजूनही वडिलांच्या धक्क्यावरच अवलंबून आहे. आता 'द मर्डरर' नावाच त्याचा एक चित्रपट येतोय. हा चित्रपट म्युझिकल थ्रिलर आहे.

रॉकी (मिमोह चक्रवर्ती) पॉप सिंगर आहे. तो हॉटेल हॅमिल्टन पॅलेसमध्ये गात असतो. मुलींमध्ये तो लोकप्रिय आहे. प्रत्येक मुलगी त्याला आपला मित्र बनविण्याची इच्छा राखून असते. नेहा (मोनालिसा) रॉकीबरोबर परफॉर्म करत असते. तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करते. पण व्यक्त करत नाही. रॉकीला तिच्या ह्रदयात काय चाललंय ते कळत नाही. तो तिच्याकडे मैत्रिण म्हणूनच पहातो.

महिमा (सिमरन) नावाची मुलगी रॉकीची प्रचंड चाहती आहे. पण रॉकीच्या ह्रदयात प्रियंका (मधु) वसलेली आहे. ती त्याच हॉटेलमध्ये उतरलेली आहे. पण रॉकीच्या मनातले ओठांवर आल्यानंतर नेहा व महिमाला धक्का बसतो. महिमा आत्महत्या करते.

रॉकीला त्यासाठी दोषी धरले जाते.यातून त्याची कशी सुटका होते, ते यात दाखविले आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi