निर्माता - राकेश ओमप्रकाश मेहरा, रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा संगीत - ए. आर. रहमान, रजत ढोलकियाकलाकार - अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ओम पुरी, दिव्या दत्ता, ऋषी कपूर, वहिदा रहमान, पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक, तनवी आजमी, केके रैना, अतुल कुलकर्णीभारतीय वंशाचा अमेरिकन तरून रोशन (अभिषेक बच्चन) पहिल्यांदाच भारतात येतो. त्याची आजी खूपच आजारी असते आणि तिला आपल्या शेवटच्या दिवसात भारतात राहण्याची तीव्र इच्छा असते. पाश्चात्य जीवनशैलीत जगणा-या रोशनला भारतीय संस्कृतीबद्दल काहीच माहिती नसते. इतकेच काय तर येथील खाद्यपदार्थही त्याला नवखे असतात. भारतात येण्यापूर्वी त्याला आपल्या आजीचे म्हणणे पटत नसायचे पण, इकहे आल्यावर येथील लोकांचे प्रेम, एकमेकांविषयीची आपुलकी पाहून तो भारावून जातो.
परंपरेच्या नावाखाली जुन्या चालीरीतीनं चिकटून गेलेल्या बिट्टूला(सोनम कपूर) ही बंधने झुगारून आपली वेगळी ओळख करण्याची इच्छा असते. एकदिवस रोशन आणि बिट्टू एकमेकांना भेटतात आणि बिट्टू त्याच्या प्रेमात पडते. गोबर (अतुल कुलकर्णी), जलेबी (दिव्या दत्ता) आणि नवाब साहब अली (ऋषी कपूर) यांच्याशी रोशनची भेट होते. बिट्टूचे प्रेम खरे असल्याने तिला सोडून जाऊ नकोस असे सांगून रोशनची समजूत घालण्याचा प्रयत्न ते करतात. पुढे काय होते ते चित्रपट पाहून समजावून घेण्यात मजा आहे.