निर्माता : सुनील मनचंदा, एबी कॉर्पोरेशन
दिग्दर्शक : आर. बालकृष्णन
गीत : स्वानंद किरकिरे
संगीत : इल्याराजा
कलाकार : अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विद्या बालन, परेश रावल
रिलीज : 4 डिसेंबर 2009
ही कहाणी आहे तेरा वर्षी ओरो (अमिताभ बच्चन) आणि त्याचे वडिल अमोल अत्रे (अभिषेक बच्चन) यांची. ओरो बुद्धिमान आहे, पण प्रागेरिया नावाच्या रोगाने तो ग्रस्त आहे. लाखांमध्ये एकालाच तो रोग होतो. या रोगामुळे रूग्ण वयापेक्षा जास्त मोठा दिसतो.
ओरोची बुद्धिमत्ता तेरा वर्षाच्या मुलाइतकीच आहे, पण रोगामुळे त्याचे वय ६५ वर्षे असल्यासारखे वाटते. वडिल आणि मम्मी (विद्या बालन) ही त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची माणसे आहेत.
ओरोची आई डॉक्टर आहे. तर वडिल राजकारणी. अमोल तरूण आहे आणि उत्साहीसुद्धा. त्याच्या डोक्यात सातत्याने काही ना काही नवीन विचार येत असतात. राजकारण हे वाईट नाही हे त्याला दाखवून द्यायचे आहे.
'पा' हा पिता-पुत्राच्या नात्याला नव्याने शोधण्याचा प्रयत्न आहे.