निर्माता : सोहेल खान दिग्दर्शक : डेव्हिड धवन कलाकार : सलमान खान, गोविंदा, लारा दत्ता, कैतरीना कैफ
विनोदी चित्रपटांमधून प्रेक्षकांना (काहींच्या मते आचरट) हास्यानुभव देणारे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या चित्रपटांचा धबधबा (आणि दबदबाही) काहीसा ओसरल्यासारखा झाला आहे. मल्टिप्लेक्स संस्कृती आल्यानंतर धवन यांच्या चित्रपटांची संख्या आणि त्याची चर्चाही कमी झाली. मात्र, आता ते 'पार्टनर' नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत.
चित्रपटाचे कथानक अर्थातच विनोदी आहे. प्रेम (सलमान खान) इतरांना आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी यशाचे हमखास फॉर्म्यूले सुचवित असतो. आणि एके दिवशी स्वतःच नैना (लारा दत्ता) नावाच्या पत्रकार मुलीच्या प्रेमात पडतो. प्रेमाचे सर्व फॉम्युले नैनाच्या बाबतीत निष्प्रभ ठरल्यावर प्रेमची झालेली गोची व नैनाचे प्रेम मिळविण्यासाठी त्याच्या खटापटी म्हणजे 'पार्टनर' चे कथानक.
IFM
डेव्हिड धवनचा आवडता नट गोविंदाही यात आहे. त्यामुळे 'पार्टनर' साठीचा शोधप्रवास प्रेमचा एकट्याचा नसून गोविंदाचाही आहे. त्यांना इच्छित पार्टनर मिळविण्यात यश येते काय? यासाठी 'पार्टनर बघावा लागेल.