Article Film Preview Marathi %e0%a4%ab%e0%a5%85%e0%a4%b6%e0%a4%a8 %e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%ae%e0%a4%b0 %e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be 108102200009_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॅशन : ग्लॅमर जगाचा आरसा

फॅशन ग्लॅमर जगाचा आरसा
IFMIFM
निर्माता - मधुर भांडारकर, देवेन खोटे, रॉनी स्क्रूवाला, जरीना मेहता
दिग्दर्शक - मधुर भांडारकर
संगीतकार - सलीम-सुलेमान
कलाकार - प्रियांका चोप्रा, कंगना, मुग्धा गोडसे, आरबाज खान, समीर सोनी, अर्जुन बाजवा, किट्टू गिडवानी

मधुर भांडारकर यांचे चित्रपट नेहमीच समाजाचा आरसा राहिलेले आहेत. मी माझ्या चित्रपटातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांचे म्हणणे असते. यावेळी मधुर यांनी फॅशनचे जग निवडले आहे.

webdunia
IFMIFM
गेल्या काही वर्षापासून मिडियाने फॅशनला महत्त्व दिले आहे. फॅशनच्या झगमगत्या जगाबाबत सर्वसामान्यांना कमालीचे आकर्षण असते. ही मॉडल कोण आहे? कोठून आली आहे? यांची जीवन कसे असते? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ‘फॅशन’ मधून मधुर यांनी केला आहे.

छोट्या शहरात राहणा-या मेघना माथुर (प्रियांका चोप्रा) या मुलीची ही कथा आहे. आपण मोठे होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा तिचा प्रयत्न असतो. पण, रूढी-परंपरेला चिटकून असणा-या कुटुंबातील असते. प्रसिद्धी आणि झगमगाट तिला फॅशनच्या जगताकडे आकर्षित करतो.

webdunia
IFMIFM
पडे रंग आणि मेकअप फॅशन जगताचा एक हिस्सा आहे आणि मेघना या रंगात भिजून जाते. लवकरच ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचते. भारतातील प्रमुख डिजाइनर्ससाठी ती रॅपवर आपला जलवा दाखवू दाखते. पार्टी, उत्पादनांसाठी मॉडलिंग, फोटो शूट, रोमांस सगळीकडे मेघना दिसून येते. आणि ती प्रसिद्धीच्या झोतात येते. मेघनाची ही यशोगाथा दाखविताना दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी फॅशनचे जग अगदी जवळून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मॉडल्स, डिजाइनर्स, फोटोग्राफर्स अशांनी चित्रपट आपल्याला फॅशनच्या दुनियेत घेऊन जातो.

कंगनाने शोनाली गुजराल नामक भूमिका रंगवली आहे. प्रसिद्ध मॉडल गीतांजली नागपाल यांना समोर ठेवून ही भूमिका दाखविण्यात आली मुग्धा गोडसेने जेनेट ही भूमिका केली आहे. जेनेटला फॅशनजगतात जास्त प्रसिद्धी मिळालेली नाही. मधुर यांनी फॅशनजगातील बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 29 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi