बॅनर : यशराज फिलम्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : मनीष शर्मा
संगीत : सलीम-सुलैमान
कलाकार : अनुष्का शर्मा, रणवीर सिंह
रिलीज डेट : 10 दिसम्बर 2010
अनुष्का आणि यशराजचे चांगले सुत जुळते ते या चित्रपटावरुन स्पष्ट होते. अनुष्काचा हा यशराजसोबतचा तिसरा चित्रपट आहे. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्काचे लॉंचिंग करण्यात आले होते. आता यशराजने आपल्या नवीन चित्रपटात अनुष्काला घेतले असून, रणवीर कपुरचे हे लॉंचिंग आहे.
लग्नाशी या चित्रपटाचा काहीतरी संबंध असल्याचे या चित्रपटाच्या नावावरुनच स्पष्ट होते. श्रुती अर्थात अनुष्का वीशीतील तरुणी आहे. ती दिल्लीत रहाते. बिट्टो (रणवीर) दिल्ली विद्यापीठातच शिक्षण घेत आहे.
योगायोगाने दोघांची भेट होते, आणि दोघेही बिझनेस पार्टनर होण्याचा निर्णय घेतात. लग्न लावून देण्याचा व्यवसाय ते सुरु करतात. यासाठी ते काही नियम तयार करतात. त्यातील महत्वाचा नियम म्हणजे, ‘ज्याच्यासोबत व्यापार करायचा आहे, त्याच्यावर प्रेम करायचे नाही.’
अनेकांची लग्न लावताना, ते ठरवलेले नियम मोडतात, एकमेकांच्या जवळत येतात असा चित्रपटाचा सार आहे.