Article Film Preview Marathi %e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4 %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c 108052900012_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहुचर्चित 'सरकार राज'

बहुचर्चित 'सरकार राज'
निर्माता दिग्दर्शक- रामगोपाल वर्म
कलावंत- अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, तनिषा मुखर्जी, व्हिक्टर बॅनर्जी, गोविंद नामदेव.

IFMIFM
'सरकार' बनविणारा रामगोपाल वर्मा आता 'सरकार राज' घेऊन येत आहेत. या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. कारण बच्चन कुटुंबिय या चित्रपटाद्वारे एकत्र पडद्यावर येत आहेत. शिवाय रामूच्या सरकारची हाताळणी चांगली असल्याने 'सरकार राज' मध्ये तो काय दाखवतोय ही उत्सुकता आहेच. यात अभिषेक बच्चनची भूमिका महत्त्वाची आहे, असे ऐकायला येते आहे.

'सरकार राज' राजकीय नाट्य आहे. नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष यात आहे. नव्या आणि जुन्या दृष्टिकोनांमधील फरकही यात अधोरेखित केला आहे.

webdunia
IFM
अनिता राजन (ऐश्वर्या राय बच्चन) शेपर्ड पॉवर प्लांट या आंतरराष्ट्रीय कंपनीची सीईओ आहे. तिला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक वीज निर्मिती प्रकल्प उभा करायचा आहे. पारखी शंकर (अभिषेक बच्चन) या प्रकल्पाचे महत्त्व जाणून आहे. त्याच्यातून होणारे फायदेही त्याला कळतात. पण सरकार (अमिताभ बच्चन) यांचा त्याला विरोध आहे. त्याची अनेक कारणे आहेत. पण शेवटी शंकरची भूमिका त्यांना पटते.

webdunia
IFM
मग अनिता शंकरबरोबर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघते. या दौर्‍यातून लोकांचा पाठींबा मिळविणे हा त्यांचा हेतू आहे. दोघांचे उद्दिष्ट हा प्रकल्प उभारणे हे असते. पण हा मुद्दा अचानक राजकीय बनतो. सरकारविरोधी लोक एकत्र येतात आणि त्याला विरोध करतात. सरकारला संपविण्याची त्यांची योजना असते. पुढे काय होते, हे पडद्यावर पाहणेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

रामगोपाल वर्माचा हा चित्रपट सरकारच्या एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले जाते. विशेष म्हणजे अभिषेक व ऐश्वर्या यात असूनही त्यांच्यात प्रणयदृश्ये नाहीत. कारण हा पूर्ण चित्रपट गंभीर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi