Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माय नेम इज खान

माय नेम इज खान
IFM
निर्माता : हिरू यश जौहर, गौरी खान
दिग्दर्शक : करण जौहर
कहानी-स्क्रीनप्ले : शिबानी बाठिज
गीत : निरंजन आयंगा
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार : शाहरुख खान, काजोल, जिमी शेरगिल, ज़रीना वहाब
रिलीज़ डेट : 12 फेब्रुवारी 2010

webdunia
IFM
रिजवान खान (शाहरूख खान)
माझं नाव रिजवान खान. मी थोडा वेगळा वाटू शकतो. कारण एक्स्पर्जर सिंड्रोम या व्याधीने मला ग्रासलंय. डॉक्टर हेन्स एस्पर्जर यांनी या रोगाचे विश्लेषण केले म्हणून त्यांचे नाव याला देण्यात आले. हा रोग आहे, याचा अर्थ मी बावळट किंवा बिनडोक आहे असा नाही. मी बुद्धिमान आहे. पण लोक मला समजून घेण्यात कमी पडतात. काही लोक कधी काय बोलतात ते मला कळत नाही आणि मी काय वागतो ते लोकांना कळत नाही. लोक मला घरी बोलावतात आणि मी गेलो की म्हणतात आत्ता का आला? त्यामुळे काहींना मी असभ्य, शिष्ट वाटू शकतो. पण मी तसा नाही. माझी आई सांगते, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. चांगले आणि वाईट. मी चांगला माणूस आहे.

webdunia
IFM
त्याची कथा
रिजवान खान भारतीय मुस्लिम आहे. भाऊ आणि वहिनी यांच्याबरोबर रहाण्यासाठी तो अमेरिकेत सन फ्रान्सिस्कोला जातो. रिजवानचे मंदिराशी प्रेम जुळते. कुटुंबाचा विरोध पत्करून दोघेही लग्न करतात. व्यवसाय सुरू करतात. पण ११ सप्टेंबर २००२ नंतर त्यांचे आयुष्य बदलते. अमेरिकी लोकांचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोनच या दिवशी बदलून जातो. या सगळ्याचा परिणाम रिजवान व मंदिराच्या नातेसंबंधांवर होतो. मंदिरा त्याच्यापासून दूर जाते. मंदिराच्या विरहाने तो दुखावतो. मंदिराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी तो अमेरिकेत एका आगळ्या प्रवासाला निघतो. त्याचा हा प्रवास म्हणजे माय नेम इज खानची कथा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi