Article Film Preview Marathi %e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa %e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%87 %e0%a4%86%e0%a4%aa 108051600012_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेरे बाप पहले आप

मेरे बाप पहले आप
निर्माता : रमण मारू - केतन मारू - मानसी मारू
दिग्दर्शक : प्रियदर्शन
संगीत : विद्यासागर
कलाकार : अक्षय खन्ना, परेश रावल, जेनेलिया डिसूजा, मनोज जोशी, ओम पुरी, राजपाल यादव, शोभना.

IFM
जनार्दन विश्वंभर राणे (परेश रावल) यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी खर्च केली आहेत. पण त्यांची बायको त्यांना आणि त्यांच्या दोन मुलांना चिराग (मनोज जोशी)आणि गौरव (अक्षय खन्ना) यांना सोडून गेली आहे.

जनार्दनने या दोघांना खूप काळजीपूर्वक वाढविले आहे. गौरव हा त्यांचा विशेष लाडका. गौरवचे त्याच्या वडिलांवरही तितकेच प्रेम आहे. परंतु,
webdunia
IFM
त्याला जनार्दनचे मित्र माधव माथूर (ओमपुरी) यांचा स्वभाव मुळीच आवडत नसतो. त्यांचा घटस्फोट झालेला आहे. त्यांची आणखी एक लग्न करण्याची इच्छा असते.आणि ते या कामासाठी नेहमी जनार्दनला घेऊन जात असतात. या भानगडीत ते अनेकदा बिकट परिस्थितीत अडकलेले असतात आणि त्यांना यातून गौरवने बाहेर काढलेले असते.

गौरवला अचानक एका मुलीचा फोन येण्यास सुरुवात होते. ती त्याची नेहमी काही ना काही खोड काढत असते. गौरव वैतागून त्या मुलीचा शोध लावतो, ती असते शिखा (जेनेलिया डिसूजा). ती गौरवचीच मैत्रीण असते. शिखा गार्जियन अनुराधा (शोभना) सोबत रहात असते. अनुराधा जनार्दनच्या आयुष्यात येऊन गेलेली असते.

webdunia
IFM
गौरव आणि शिखा एकमेकांच्या जवळ येतात, अचानक एके दिवशी जनार्दन आणि अनुराधा यांची भेट होते. त्यांच्या हावभावावरून त्यांना या दोघांचा संशय येतो. यानंतर गौरव अनुराधा आणि जनार्धन यांचे लग्न लावून देण्याचा निश्चय करतात. अखेर अनेक संकटांचा सामना करत त्यांचे शुभमंगल होते. हे सगळे विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi