Article Film Preview Marathi %e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%ac%e0%a4%be 108070300009_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेहबूबा

मेहबूबा
IFM
निर्माता-निर्देशकः अफज़ल खान
संगीतः इस्माईल दरबार
कलाकारः संजय दत्त, मनीषा कोईराला, अजय देवगण

न्यूयॉर्कचा रहिवासी असलेला श्रवण धारीवाल (संजय दत्त) एक मोठा उद्योगपती आहे. त्याने आजवर जीही काही स्वप्ने
पाहिली, ती काहीही करून पूर्ण केलीच. ऐशो-आरामाच्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. नसतील त्या कोणत्याही किमतीत
खरेदी करण्याची त्याच्यात ताकत आहे. आजवरच्या आयुष्यात त्याने कोणत्याही पद्धतीने केवळ विजय मिळविला आहे.

आपल्या याच लाइफस्टाइलमुळे तो मुलींमध्ये प्रचंड पॉप्युलर आहे. त्याच्या मते हव्या त्या मुलीचे प्रेम तो पैशांच्या बळावर
मिळवू शकतो. मात्र वर्षा (मनीषा कोईराला) त्याला भेटते आणि त्याचा हा भ्रम खोटा ठरतो.

webdunia
IFM
वर्षाच्या दृष्टीने आत्म-सन्मान आणि नैतिकता पैशांहून अधिक महत्त्वाची आहे. अमेरिकेत राहूनही तिच्यावर तिथल्या वातावरणाचा आणि संस्कृतीचा कुठलाही प्रभाव नाही. श्रवण तिच्यावर भाळतो, मात्र वर्षा त्याला काहीही महत्त्व देत नाही.
श्रवणला नकार ऐकण्याची सवय नाही. अनेक महागड्या भेट वस्तूंनी तो वर्षाची मर्जी जिंकण्याचा प्रयत्न करतो. मात्र या गोष्टींचा वर्षावर काहीही परिणाम होत नाही.

एका पार्टीत वर्षा हजारो लोकांसमोर श्रवणचा अपमान करते. श्रवण या घटनेने जोरदार हादरतो. स्त्री कुठली वस्तू नाही याची जाणीव पहिल्यांदा त्याला होते. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तो वर्षाकडे माफी मागून तिच्या वडिलांशी बोलून तिला लग्नाची मागणी घालतो.


वर्षाचे वडील श्रवणवर विश्वास करून तिला माफ करायला सांगतात. वर्षा त्याला माफ करते. दोघांचा साखरपुडा होतो. सुट्या घालविण्यासाठी दोघे फिरायला जातात आणि तिथे सर्व बंधने सोडून जवळ येतात.

नंतर मात्र श्रवण आपण केवळ वर्षाला धडा शिकविण्यासाठी नाटक करीत असल्याचे स्पष्ट करतो. या गोष्टीचा वर्षाला मोठा धक्का बसतो. वर्षा पूर्णतः नाराज होऊन त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाते.

काही वर्षांनी श्रवण त्याचा लहान भाऊ करण (अजय देवगण) याच्या लग्नासाठी भारतात येतो. करणचा स्वभाव श्रवण पेक्षा पूर्ण वेगळा आहे. करण यूरोपमध्ये असतो, श्रवणला आपली प्रेयसी पायलबद़दल सांगतो. पायलवर त्याचे प्रचंड प्रेम असते. लग्नाचा दिवस जवळ येतो आणि पायल भारतात येते. करण तिची भेट श्रवणशी घालून देतो. तर वर्षा हिच पायल असल्याचे समोर येते.

webdunia
IFM
आता पायलनेही श्रवणला धडा शिकविण्यासाठी नाटक केले का?
की नशिबाने तिची केलेली ही थटटा आहे?
श्रवण, याबाबत काय भूमिका घेतो
श्रवण आणि वर्षाच्या संबंधांबद़दल कळल्यानंतर करणचं काय होत?
हे जाणून घेण्यासाठी 'मेहबूबा' पाहावा लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi