Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a4%ac %e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80 108111400001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'रब ने बना दी जोडी'

रब ने बना दी जोडी
IFM
निर्माता - आदित्य चोप्रा, शाहरूख खान सहनिर्माता
दिग्दर्शक - आदित्य चोप्रा
संगीत - सलीम - सुलेमान
कलाकार - शाहरूख खान, अनुष्का शर्मा, पाहुणे कलाकार - राज कपूर, रिशी कपूर, देव आनंद, राजेश खन्ना

आपल्या चित्रपटाचा प्रचार करावा तर आदित्य चोप्रा यांनीच. एक काळ गाजवणा-या त्यांच्या बॅनरला शोभणारे चित्रपट अलीकडे प्रदर्शित होत नसले तरी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केली जाणारी हवा प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यत आणून सोडतेच.

यशराज फिल्मची घटती लोकप्रियता लक्षात घेऊन आदित्य यांनी स्वत: मैदानात उडी घेतली. शाहरुख खान आणि त्यांच्या यशस्वी जोडीचा हा चित्रपट असल्याने आणि जोरदार प्रसिध्दी केली गेल्याने दर्शकांच्यात कमालीची उत्सुकता आहे.

webdunia
IFM
चित्रपटाच्या पोस्टरमधील शाहरुख पाहिल्यास तो 'किंग खान' आहे याच्यावर विश्वासच बसत नाही. मोठा चष्मा, लुज कपडे, साधी हेयर स्टाईल, अशा साध्या वेशातील शाहरूख खानच्या या भूमिकेविषयीही दर्शकांना कमालीची उत्कंठा आहे.

या पोस्टरनंतर काही दिवसांनी दुसरे पोस्टर बाहेर पडले. यामध्ये शाहरुख आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिसून येतो. आता हे पोस्टर पाहिल्यानंतर मात्र, शाहरूखची भूमिका आणि चित्रपटाचे कथानक काय आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे?

कोणाला वाटता शाहरुखचा डबल रोल आहे तर कोणाला वाटते 'गोलमाल' सारखीच कथा आहे. 'प्लेन जेन' या चि‍त्रपटावरही आधारीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यशराज फिल्म्सनेही हा सस्पेंस कायम ठेवला आहे. त्यांनी चित्रपटाची कथा उघड केलेली नाही. सुरिंदर साहनी (शाहरुख) हा पंजाब पॉवरमध्ये काम करत असतो. तानी (अनुष्का शर्मा) वर त्याचे प्रेम असते. पण, तिचा स्वभाव त्याच्या परस्पर विरोधी आहे. अश्रू, आनंद, दुख:, प्रेम आणि नृत्य अशा अंगाने ही कथा बांधण्यात आली आहे. 'ओम शांती ओम' मधील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे 'रब ने बना दी जोडी' या चित्रटाची क्रेझ वाढविण्यासाठी एका गाण्यामध्ये काजोल, प्रिती झिंटा या स्टार्स बरोबरच राज कपूर, रिशी कपूर, देव आनंद, राजेश खन्ना आदींचा सहभाग करण्यात आला आहे. सोनु निगम यांनी या गीतांना आवाज दिला आहे.

तब्बल आठ वर्षांनंतर यश चोप्रा यांनी स्वत: दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्यादृष्टीनेही हा चित्रपट आव्हानच आहे. कथानक उघड न करता पोस्टर्सच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्यात आदित्य चोप्रा यांना यश मिळाले आहे. याबाबत त्यांनी इतकी गोपनीयता पाळली आहे की, शूटिंगवेळीही त्यांच्यासह शाहरुख खान आणि त्यांचा सहाय्यक या तिघांनाच कथानक माहित होते. विशेष म्हणजे नायिका अनुष्का शर्मापासून चित्रपटात काम करणा-या इतर कलाकरही यापासून अनभिज्ञ होते. 'दोस्ताना' बरोबर 'रब ने बना दी जोडी' चे ट्रेलर प्रदर्शित होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi