Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a4%b6 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95 112101800008_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रश चित्रपटाचे कथानक

रश
बॅनर : परसेप्ट पिक्चर कंपनी, शोमेन इंटरनॅशनल
दिग्दर्शक : शमीन देसाई, प्रियंका देसाई
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : इमरान हाशमी, सागरिका घाटगे, नेहा धूपिया, आदित्य पंचोली
प्रदर्शन तारीख : २४ ऑक्टोबर २०१२

PR
PR


शमीन देसाई यांनी २०१० मध्ये इमरान हाश्मी सोबत 'रफ्तार २४ बाय ७' नावाने एका चित्रपटाची सुरूवात केली होती, मात्र शमीन यांच्या अकाली निधनाने हा चित्रपट पूर्ण होणार नाही असे समजले गेले असतानाच शमीन यांची पत्नी प्रियंका देसाई यांनी धाडस दाखवून चित्रपटाच्या कामास परत सुरूवात केली. नव्याने कलाकारांच्या व तंत्रज्ञांच्या तारखांचा मेळ घालणे सोपे नव्हते. मात्र इमरान हाश्मीने चित्रपट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने 'रश' नावाने हा चित्रपट येत्या २४ तारखेला प्रदर्शित होत आहे.

webdunia
PR
PR


प्रसारमाध्यमं, राजकारण, गुन्हेगारी आणि प्रेमाच्या अवतीभोवती 'रश' चे कथानक फिरते. इमरान हाश्मी पत्रकाराच्या भूमिकेत असून ही भूमिका केल्यानंतर पत्रकारांप्रती त्याचा सन्मान दुणावला आहे. पत्रकारांचे काम खरोखरच कठिन असते, याची प्रचिती त्याला आली आहे.

कथानक पल्स ३६० न्यू कॉर्पोरेशन मध्ये काम करणार्‍या सॅम ग्रोव्हर इमरान हाश्मीचे आहे. कोणत्याही वृत्ताच्या तळापर्यंत जाऊन सत्या बाहेर आणण्यात त्याचा हातखंडा आहे. गुरगांव, हरियाणा येथे त्याचे कार्यालय आहे.

webdunia
PR
PR


त्याचा लहानपणीचा अनुभव वाईट असतो. वडिल दारूडे असते व आई त्याला सोडून गेलेली असते. अहाना शर्मा या आपल्या प्रेयसीसोबत तो लिव इन रिलेशनशिप मध्ये आहे. ती आर्टीस्ट असून नवी दिल्लीत एक आर्ट गॅलरी चालवते. ती मुळची मुंबईची आहे.

webdunia
PR
PR


सॅम खूप प्रसिद्ध टॉक शो करत असतो, मात्र पल्स ३६० मधून त्याला काढून टाकण्यात येते. क्राइम २४ न्यूज चॅनलची प्रमुख लिसा कपूर नेहा धूपिया सॅमला नोकरी देते. त्याला मोठा पगार, नवीन बीएमडब्ल्यू व शानदार घर मिळते. लिसा प्रतिमा विशेष चांगली नाही. ती सॅमकडे आकर्षित होते.

webdunia
PR
PR


प्रसारमाध्यम सम्राट त्याला एक काम सोपवते तेव्हा त्याला आयुष्यात वादळ येते. ते काम स्विकारून सॅम चक्रव्युहात फसत जातो. प्रसारमाध्यमांत पैसे, ताकद व ग्लॅमरचा कसा जोर चालते हे 'रश' मध्ये दाखवण्यात आले आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi