Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%88%e0%a4%af%e0%a4%be 107100400015_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रहस्याचा 'भूलभुलैया

रहस्याचा 'भूलभुलैया
निर्माता : भूषण कुमार, किशन कुमार
दिग्दर्शक : प्रियदर्शन
गीतकार : समीर
संगितकार : प्रीतम
कलाकार : अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहूजा, अमीषा पटेल, परेश रावल, राजपाल यादव, असरानी

IFMIFM
प्रियदर्शन यांचा आगामी 'भूलभुलैया' हा 'मणिचित्रा थाजू' या ‍मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ मल्याळम चित्रपटात दिग्दर्शनाची जबाबदारी फाजिल यांनी सांभाळली होती. प्रियदर्शन त्यावेळी त्यांचे सहाय्यक होते. आपल्या गुरूंचा चित्रपट आता ते हिंदीमध्ये घेऊन येत आहेत. प्रियदर्शनच्या मनात खूप दिवसांपासून या चित्रपटाची योजना घोळत होती, ती आता पूर्ण होत आहे.

प्रियदर्शनच्या मते, मानसशास्त्र हा या चित्रपटाचा आधार असून त्याद्वारे वेगळे काही देण्याचा प्रयत्न आहे. प्रियदर्शनच्या बहुतेक चित्रपटांप्रमाणे हेही एका गावांतील कथानक आहे. या गावात एक ब्राह्मण कुटुंबही रहाते.

बद्रीनारायण चतुर्वेदी (मनोज जोशी) हे कुटुंबप्रमुख आहे
webdunia
IFMIFM
. त्यांच्या हवेलीत भूताचे वास्तव्य असल्याचे गावकर्‍यांची समजूत आहे. अमेरिकेत असणार्‍या बद्रीच्या छोट्या भावाचा मुलगा सिद्धार्थ (शायनी आहूजा) व त्याची पत्नी अवनी (विद्या बालन) कुटुंबाच्या भेटीसाठी गावात येतात. त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येते.


आधुनिक जगात वावरणार्‍या सिद्धार्थचा भूत-प्रेतावर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे सर्वांच्या विरोधास न जुमानता तो हवेलीत राहण्याचा हट्ट धरतो आणि तो अमलातही आणतो. सिद्धार्थच्या हवेलीत प्रवेशापासून रहस्यमय घटनांच्या मालिकेस सुरूवात होते.

webdunia
IFMIFM
संकटाच्या वेळी त्याला आपला डॉक्टर मित्र आदित्य श्रीवास्तवची (अक्षय कुमार) आठवण येते. आदित्यचा गावात प्रेवश झाल्यावर तो रहस्यमय घटनांमागचे गुपित उलगडवण्याची जबाबदारी घेतो. आधुनिक उपकरणांच्या साहय्याने तो यामागे कोण आहे, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. पण हे रहस्य सोडविणे हे आपले काम नाही, असे त्याच्या लक्षात येते. या रहस्यमय घटनांमागे कुणाचा हात आहे? त्याचा उद्देश काय? हे रहस्य जाणून घेण्यासाठी आपणांस भूलभुलैया बघावा लागेल. भूलभुलैया

Share this Story:

Follow Webdunia marathi