Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%97%e0%a4%88 %e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af %e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87 109010300020_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'रात गई...' नेमके काय घडले

रात गई नेमके काय घडले
IFM
निर्माता : रंगिता प्रीतिश नंदी, रजत कपूर
दिग्दर्शक : सौरभ शुक्ला
कलाकार : रजत कपूर, नेहा धूपिया, विनय पाठक, इरावती हर्षे, नवनीत निशान, दलीप ताहिल, अनू मेनन

'रात गई बात गई' हा गुढ कथानकावर आधारीत चित्रपट आहे. राहुल (रजत कपूर) एक फिल्म मेकर आहे. पत्नी मिताली (इरावती हर्षे) आणि मुलीबरोबर त्याचा आठ वर्षांचा सुखी संसार सुरू आहे. संसारासाठी मिताली नोकरी सोडून राहुल आणि आपल्या मुलीसाठी पुर्णवेळ देते.

एके सकाळी उठल्यावर रात्रीच्या पार्टीचा हॅगओव्हर असल्याचे त्याच्या लक्षात येते. रात्री एका सेक्सी युवतीची भेट झाल्याचेही त्याला चमकून जाते. ती एक नवखी अभिनेत्री असती. पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच खिळलेल्या होत्या. तिनेच आपल्याला दारू पाजली होती पण, त्यानंतर काय झाले हे त्याला नीटसे आठवत नाही.

त्यासकाळी मितालीही खूप रागात दिसते. आपल्याबद्दल तिला कसलीतरी शंका वाटत असल्याचे त्याला जाणवते. त्या रात्री नेमके काय झाले, हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करू लागतो. यासाठी तो आपला मित्र सक्सेना (दलीप ताहिल) आणि अमित (विनय पाठक) यांची मदत घेतो. या पार्टीत नेमके काय होते? नशेमध्ये त्याच्या हातून चूक होते? हे जाणून घेण्यासाठी पाहा ' रात गई बात गई '

Share this Story:

Follow Webdunia marathi