Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80 108101300012_1.htm

Dharma Sangrah

रामचंद पाकिस्तानी

रामचंद पाकिस्तानी
IFMIFM
दिग्दर्शक : मेहरीन जब्बार
कलाकार : नंदिता दास, रशीद फारूकी, नोमान इज़ाज, मारिया वास्ती, नवैद जब्बार, सईद फजल हुसेन

पाकिस्तानी चित्रपटांचा बाजही आता बदलत आहे. ‘रामचंद पाकिस्तानी’ हा असाच बदल स्विकारणारा चित्रपट आहे.

‘रामचंद पाकिस्तानी’ या चित्रपटात नियंत्रण रेषा पार करणा-या सामान्य माणसांची कथा दाखविण्याचा प्रयत्न आहे एक मुलगा आणि त्याचे वडील चुकून नियंत्रण रेषा पार करतात. त्यामुळे त्यांना भारतात कारावास भोगावा लागतो. हा विषय दिग्दर्शक मेहरीन जब्बार यांनी मांडला आहे. जे लोक चुकून नियंत्रण रेषा पार करतात आणि वर्षानुवर्षे बंदिवास भोगतात त्यांच्या यातना काय असतील, यावर त्यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रवत्न केला आहे.


हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. वास्तविक सत्य घटनेवर आधारीत चित्रपट बनविणे कठीण काम आहे. पण, दिग्दर्शक मेहरीन जब्बार यांचा हा यशस्वी प्रयत्न आहे. चित्रपटात काही त्रुटीही आहेत. मुख्य कथेबरोबर काही घटनाक्रम आहेत त्यामुळे वेगळी दिशा मिळते. जर मुख्य मुद्द्यावरच अधिक लक्ष दिले असते तर चित्रपट अजूनही प्रभावी ठरला असता.

यामध्ये सईद फज़ल हुसेन, नंदिता दास, रशीद फारूकी आणि नोमान इजाज आदींच्या भूमिका आहेत. काहीतरी हटके असा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi