Article Film Preview Marathi %e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3 %e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 108031100014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेस : कोण जिंकणार?

रेस : कोण जिंकणार?
IFM
निर्माता : कुमार एस. तौरानी-रमेश एस. तौरानी
दिग्दर्शक : अब्बास-मस्तान
गीतकार : समीर, ताज
संगीत : प्रीतम
कलाकार : सैफ अली खान, बिपाशा बसू, कैटरीना कैफ, अक्षय खन्ना, समीरा रेड्डी, अनिल कपूर

रणवीर (सैफ अली खान) आणि राजीव (अक्षय खन्ना) सावत्र भाऊ आहेत. दक्षिण आफ्रिकेत असणार्‍या डर्बनमध्ये दोघांचा घोड्यांचा तबेला आहे. राजीवपेक्षा मोठा असणारा रणवीर आक्रमक स्वभावाचा असून राजीव आळशी आहे. राजीवला दारूचे व्यसन आहे.

सोफिया (कैतरीना कैफ) रणवीरची सेक्रेटरी असून आपल्या बॉसवर ती मनापासून प्रेम करीत असते. रणवीरला मात्र तिच्या प्रेमाचा थांगपत्ताच नाही. शायना (बिपाशा बसू) एक सुंदर मॉडेल असून डर्बनमध्ये आपले करियर बनविण्यासाठी आलेली असते. रणवीर, शायना यांचे एकमेकांवर प्रेम आहे.

webdunia
IFM
रॉबर्ट डी. कोस्टा उर्फ आर. डी. (अनिल कपूर) गुप्तहेर आहे. फळं खायला त्याला फार आवडतात. फळं खात-खातच लोकांच्या समस्या तो सोडवितो. त्याच्या या कामात सेक्रेटरी मिनी (समीरा रेड्डी) त्याची मदत करते. मिनीला मुर्खासारखे काहीही प्रश्न विचारायची सवय असते. शायनाला रणवीर आवडतो. पण काही कारणाने तिचे लग्न त्याचा लहान भाऊ राजीवशी होते. राजीवला दारूचे व्यसन आहे, हे कळल्यावर तिची सर्व स्वप्न धुळीस मिळतात.

राजीवने शायनाशी लग्न झाल्यानंतर तो दारू पिणे बंद करेल असे वचन दिल्यानेच रणवीरने प्रेमाचा त्याग केलेला असतो. पण राजीव दिलेले वचन मोडतो.

एक क्षण असा येतो की रणवीर आणि शायना परत जवळ येतात आणि लहान भावाच्या पत्नीसोबत मोठ्या भावाचे अफेअर सुरू होते. राजीवला शायनाचा संशय यायला लागतो.

webdunia
IFM
अचानक एक हत्या होते, हत्येचा शोध आर. डी. सुरू करतो. इथूनच कथानकाला वळण मिळते. त्यानंतर चित्रपटात असे काही चढ उतार येतात की पुढे काय घडेल याचा अंदाज लावणेच कठीण होऊन जाते.

अब्बास मस्तानने 'रेस' आपल्या नेहमीच्या शैलीत बनविला आहे. डर्बनचे सुंदर लोकेशन, घोडेस्वारीची पार्श्वभूमी, तीन हॉट नायिका, जबरदस्त ऍक्शन, रहस्य, थ्रिल, याने परिपूर्ण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा त्यांना विश्वास आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi