दिग्दर्शक: अभिषेक कपूर
कलाकार: फरहान अख्तर, प्राची देसाई, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, ल्यूक केन.
'रॉक ऑन' या चित्रपटाचे कथानक स्वप्न पाहणार्या चार युवकांच्या भोवती गुंफण्यात आले आहे. चारही युवकांचे एक स्वप्न आहे. एके दिवशी त्यांचा रॉक ग्रुप जगात सर्वश्रेष्ठ ठरेल. चारही युवकांच्या घरची परिस्थिती चांगली असते. मात्र, सगळे ऐशारामाचे जीवन सोडून रॉक बॅंडसाठी स्वत:ला वाहून घेतात. खूप मेहनत घेऊनही त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यानंतर ते हताश होऊन आपापल्या व्यवसायात गुंतून जातात. त्यामुळे त्यांची ताटातूट होते.
मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिलेले असते. ते चौघे पुन्हा एकत्र येतात. त्या चार युवकांची स्वप्नपूर्ती होते का? त्याचा रॉक ग्रुप सर्वोत्कृष्ट होतो का ? हे तर 'रॉक ऑन' पाहिल्यानंतरच कळेल.