निर्माता : कृष्ण चौधरी, सुमीत सहगल, विपिन जैन दिग्दर्शक : राजेश रणसिंघे कलाकार : तनुश्री दत्ता, उदिता गोस्वामी, शाद रंधावा, सचिन खेडेकर
अनुष्का (तनुश्री दत्ता) व अहाना (उदिता गोस्वामी) सख्ख्या बहिणी आहेत. अनुष्काचे लग्न तिच्याहून बराच मोठा असलेल्या रवीशी (सचिन खेडेकर) झालेले आहे. रवीची पहिली बायको अपघातात गेली आहे. अनुष्काच्या या लग्नाने तिची आई नाराज आहे, त्याचवेळी रविच्या लहान बहिणीलाही ते पसंत नाही.
PR
रवी व अनुष्काच्या लग्नाचा दुसरा आहे. रवी तिला एक बंगला भेट देतो. ते बंगल्यात रहायला जातात. मात्र तिथे चित्रविचित्र घटना घडतात. अनुष्का घाबरते आणि रविला घेऊन पुन्हा जुन्या बंगल्यात रहायला जाते. तरीही घटना काही तांबत नाहीत. मग याच काळात रविचीही हत्या होते. त्याचा आळ तिच्यावरच येतो.
अनुष्काच्या मदतीला तिची बहिण आहाना धावून येते. तिकडे रणवीर (शाद रंधावा) हा पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करतो आहे. या तपासात नेमके काय सापडते ते पडद्यावर पहाणे औत्सुक्याचे ठरेल.