बॅनर : श्री अष्टविनायक सिनेविज़न लिमिटेड निर्माता : ढिलिन मेहतादिग्दर्शक : सोहम शाह संगीत : सलीम-सुलेमान कलाकार : संजय दत्त, इमरान खान, श्रुती के. हसन, मिथुन चक्रवर्ती, डॅनी, रवि किशन, रती अग्निहोत्री कमल हसनची मुलगी श्रुती हसन पदार्पण करत असलेला 'लक' हा महत्त्वाचा चित्रपट आहे. यात हिरो आहे इमरान खान. ही कथा आहे, राम मेहराची (इमरान खान). या रामकडे सगळं काही आहे. ताकद आहे, पैसा आहे, पण संधी नाहीये. यातून त्याला बाहेर पडायचे आहे. एक दिवस नशीबाने त्याला संधी मिळते. राम ही संधी साधतो. त्यानंतर त्याला वाटतं आपण या समस्यांमधून बाहेर पडू. पण तसे होत नाही. एकामागोमाग एक संकटे येत जातात आणि त्यातून मार्ग काढत त्याला जावे लागते. प्रत्येक वेळा नशीब त्याची परिक्षा पहाते.
रामच्या समोर अडचणींचे डोंगर उभे करण्याचे काम मूसा (संजय दत्त) करतो. मूसा नशीबवान आहे. गॅंबलिंगच्या जगताचा डॉन आहे. मूसाशी लढण्यासाठी रामला रिटायर्ड मेजर (मिथून चक्रवर्ती) आणि कैदी (रवी किशन) तसेच डॅनीव चित्रांशी यांची मदत मिळते.
'लक'चे शुटींग दक्षिण आफ्रिका, बॅंकॉक व गोवा येथे झाले आहे.