बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़ा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
संगीत : आर. आनंद
कलाकार : नील नितिन मुकेश, दीपिका पादुकोण
रिलीज डेट : 20 ऑगस्ट 2010
मुंबईमध्ये रहाणार्या तरुणांची लफंगे परिंदे ही कथा आहे. या तरुणांची स्वत:चीच अशी खास स्टाईल आहे. या चित्रपटात नंदू (नील नितिन मुकेश) व पिंकी (दीपिका पदुकोण) यांची प्रेमकथाही आहे.
या दोघांची आधी मैत्री होते, नंतर दोघेही एकमेकांचे जोडीदार बनण्याचा निर्णय घेतात. नंदूचा स्वभाव जरा विचित्र आहे, असे म्हणतात की नंदू फक्त भांडणं करण्यासाठीच जन्माला आला आहे. गल्लीबोळात होणार्या हाणामार्यांमध्ये त्याचा हात कोणीही धरु शकत नाही.
पिंकी भेटल्यावर मात्र सारे काही बदलण्यास सुरुवात होते. पिंकी म्हणजेच पिंकी पालकर अंध आहे. परंतु तिला टॅलेंटचे पावरहाऊस म्हणून ओळखले जाते. एका मॉलमध्ये ती काम करत असते.
तिला जबरदस्त इच्छा शक्ती आहे. वेगळं काहीतरी करुन दाखवण्याची तिची इच्छा असते, मात्र ती अंध असल्याने नेहमीच तिला माघार घ्यावी लागते.
नंदू व पिंकी यांचा हा लफंगे परिंदे प्रेक्षकांच्या पचनी पडेल का हे मोठे कोडे आहे.
पिंकीला दृष्टी येईल का?
नंदू वन शॉट प्रेमात पडेल का?
या सार्यां प्रश्नांचा उलघडा होण्यासाठी आपल्याला केवळ फलंगे परिंदे हा चित्रपट पहावा लागणार आहे.