निर्माता : महेंद्र धारीवाल दिग्दर्शक : करण संगीत : डब्बू मलिक कलाकार : मेघना नायडू, शावर अली, तरूण अरोरा
IFM
हवस, रेन, माशूका सारख्या चित्रपटात अंग प्रदर्शन केल्यानंतर देखील मेघना नायडूच्या हातात काहीच यश आलेले नाही आहे. मागील चार वर्षांत तिचे एकही चित्रपट प्रदर्शित झालेले नाही आहे, पण मेघनाला अजूनही उमेद आहे की ती इंडस्ट्रीमध्ये जरूर सफल होईल. तिचे येणारे चित्रपट ‘लव एंड सेक्स’मध्ये तिने फारच बोल्ड दृश्य दिले आहे असे आम्ही नव्हे तर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतः म्हणत आहे.
IFM
चित्रपटाची कथा मेघना, शावर अली आणि तरुण अरोराच्या आजू बाजू फिरत आहे. मेघना आणि शावर पती-पत्नी आहे. तरुणाची मेघनाच्या लाईफमध्ये एंट्री होते आणि ते दोघेही सर्व हद्दी पार करतात, त्यानंतर तिघांच्या जीवनात अडचणींचा काळ सुरू होतो. नंतर काय होतं ते बघण्यासाठी तर तुम्हाला चित्रपट पाहणे गरजेचे आहे.
IFM
महेंद्र धारीवाल चित्रपटाचे निर्माता असून दिग्दर्शन करण ने केले आहे. संगीत डब्बू मलिकचे आहे. चित्रपटाचे नाव आणि मेघनाचे बोल्ड सीन या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. आता बघायचे आहे की मेघनाचे साहसी दृश्य दर्शकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात की नाही ?