Article Film Preview Marathi %e0%a4%b2%e0%a4%b5 %e0%a4%af%e0%a5%82 %e0%a4%ae%e0%a4%bf %e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0 111050500003_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लव यू.... मि. कलाकार

लव यू मि कलाकार तुषार
बॅनर : राजश्री प्रोडक्शन्स (प्रा. ) लि.
निर्माता : कमल कुमार बड़जात्या, राजकुमार बड़जात्या, अजीत कुमार बड़जात्या
दिग्दर्शक : एस. मनस्वी
संगीत : संदेश शांडिल्य
कलाकार : तुषार, अमृता राव, मधू, राम कपूर, प्रशांत रान्याल, स्निग्धा, किरण कुमार, प्रेम चोप्रा

PR

साहिल रस्तोगी (तुषार)चे वय आहे 25 वर्ष. तो एक कार्टूनिस्ट आहे आणि 2 वर्षाच्या कष्टानंतर संघर्षानंतर आता त्याला काही करण्याची संधी मिळाली आहे. एनिमेशन शो, जाहिरात, प्रिंट मीडियासाठी तो काम करीत आहे. त्याला त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा दबाव, ताण व बंधन आवडत नाही.

22 वर्षीय रितू दीवान (अमृता राव) 'एमबीए'ची स्टुडेंड आहे. पार्टी, गाणे, फिरणे हे तिचे आवडते छंद. तिच्या ग्रुपची ती लीडर आहे. वडिलांच्या इच्छे खातर तिने एमबीएमध्ये दाखला घेतला आहे.

webdunia
PR

साहिल आणि रितू एक-दुसऱ्याचा प्रेमात पडतात व त्यांना लग्न करायचे आहे. त्यासाठी रितू तिच्या वडिलांकडून (देशराज) परवानगी मागते व त्यांच्याशी साहिलची भेट घालवते भेट घालते.

देशराजचे म्हणणे आहे की कलाकार चांगले व जबाबदार पती नाही बनू शकत, ते फक्त त्यांच्या मनाचे करतात आणि व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळे जगात वावरणे त्यांच्यासाठी फारच अवघड असते. देशराज रितुचे लग्न साहिलशी करण्यास होकार देतो पण त्याची एक अट असते की साहिलला आधी स्वत:ला साबीत करावे लागेल की तो रितू योग्य आहे. साहिल या आव्हानाला स्वीकारतो.

webdunia
PR

कलेच्या जगातून बाहेर निघून साहिल बिझनस वर्ल्डमध्ये आपले पाय ठेवतो, जेथे दबाव आहे, ताण तणाव आहे, बंधन आहे. एक असा व्यक्ती जो डेबिट आणि क्रेडिटचे अंतर देखील पारखू शकत नाही काय तो व्यवसायाचे नवीन नियम लिहू शकेल? काय तो हे समोर आलेले आव्हानं स्वीकार करू शकेल? ‘लव यू... मि. कलाकार’मध्ये या साऱ्यांचे उत्तर सापडतील.

दिग्दर्शकाबद्दल :
एस. मनस्वीची हे पहिले चित्रपट आहे. चित्रपटाची कथा त्यांनी फक्त 17 दिवसांत पूर्ण केली आहे, पण याला अंतिम रूप देण्यासाठी त्यांना 18 महिन्याचा वेळ लागला. 70 दिवसांची शूटिंग आणि 120 दिवसांच्या पोस्ट प्रॉडक्शन नंतर त्यांचे हे चित्रपट रिलीज होण्यास तयार आहे. मनस्वीच्या मतानुसार त्यांनी ह्या चित्रपटाच्या माध्यमाने हे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्हाला उत्तम व्यक्ती होणे आवश्यक आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi