आहे. अक्षय कुमार, फरदिन खान व रितेश देशमुख तिघांच्याही तर्हा निराळ्या. मात्र, एका गोष्टीबाबत कमालीचे साम्य. तिघांनाही मुलींचा प्रचंड नाद. अक्षय कुमार एका नाइट क्लबमध्ये काम करतो. त्याच्या दिलफेक वृत्तीमुळे त्याला गर्लफ्रेंडही बऱ्याच आहेत. दुसरा फरदिन खान. याला कोणताच कामधंदा नाही. जुगार खेळून तो आपला खर्च भागवतो. त्यालाही मुलींचा नाद. या ग्रुपचा तिसरा सदस्य आहे रितेश देशमुख. तो लहान मुलांच्या बर्थडे पार्ट्यांमध्ये त्यांचे मनोरंजन करतो. पण लक्ष मात्र मुलांपेक्षा त्यांच्या आयांवर. या तिघांव्यतिरिक्त विद्या बालनही चित्रपटात आहे. विद्याला आपल्या स्वप्नातील राजकुमाराचा शोध घ्यायचा आहे.
अशी त्यांची धमाल चालली असताना एका वळणावर त्यांच्यावर लहान मुलीस सांभाळण्याची जबाबदारी येते आणि या तिघांमध्ये आमूलाग्र बदल घडतो. लहान मुलीचे पालन पोषण करताना त्यांची तारांबळ उडते. जबाबदारी त्यांना कर्तव्य शिकविते. ते मुलीची वडिनांप्रमाणे काळजी घेतात.
विनोदी चित्रपटात अक्षयची भट्टी चांगलीच जमते. प्रेक्षक त्याला या भूमिकांत पसंत करतात. या चित्रपटातून तो विद्या व रितेश सोबत पहिल्यांदाच काम करत आहेत. चित्रपट नेमका कसा जमलाय ते आल्यावरच कळेल. इतरांची खिल्ली उडविणारा साजिद स्वतःचा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा कसा बनवतो याचीही उत्सूकता आहेच.